उद्यम प्रकाशन - रूपरेषा (मराठी)

देशी भाषांतून तंत्रविषयक पुस्तके आणि मासिके प्रकाशित करणे आणि त्याद्वारे सामान्य माणसांपर्यंत व्यावसायिक ज्ञान पोचवणे, हा उद्देश ठेवून ‘उद्यम प्रकाशन’ची स्थापना झाली आहे. भारतात सर्वदूर पसरलेले हजारो छोटे-मोठे इंजिनीअरिंग उद्योग आहेत. या क्षेत्रातला शॉपफ्लोअरवरचा बहुसंख्य कर्मचारीवर्ग इंग्रजी जाणत नाही. या वर्गाला तंत्रशिक्षण देऊन त्याची उत्पादकता वाढवायची असेल, तर प्रादेशिक भाषातून तंत्रशिक्षण देणे जरुरीचे आहे. यासाठी पुस्तके महत्वाची आहेतच, पण मासिकांचेही मोठे काम आहे.

नवी उत्पादनतंत्रे, आजूबाजूला चाललेले नवे प्रयोग, बाजारात नव्याने आलेली साधनयंत्रे, नवी हत्यारे अशी माहिती नियमितपणे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम व्यावसायिक मासिके करतात.याच कारणासाठी ‘उद्यम’ने पुस्तकांबरोबर मासिकेदेखील छापण्याचे ठरवले आहे. २०१७ या वर्षात मराठी ‘धातुकाम - यंत्र आणि तंत्र’ मासिकाची सुरुवात झाली आणि २०१८ या वर्षात हेच मासिक कानडी आणि हिंदी भाषांमध्ये सुरू करणे आणि नवी चार पुस्तके मराठीत प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. पुढे वाचा

Udyam Prakashan - Profile (English)

‘Udyam Prakashan’ has been established with the objective of publishing technical books and magazines in Indian languages and thereby bring professional knowledge at the doorsteps of the common technician. There are thousands of small and medium engineering concerns spread all over India. The majority of the work force on the shop floor is not conversant with English. If these people have to be trained in order to improve their productivity, it is necessary to impart technical training in regional languages.

Books are certainly important for achieving this goal but magazines also have a major role to play. Professional magazines do an important task of bringing the latest production techniques, new experimentation's and trials being taken in the industrial domains, latest accessories and tools recently entering the market etc. to this work force. For this very reason ‘Udyam’ has decided to publish a magazine along with books. In the year 2017, the publication of the Marathi magazine ‘DHATUKAM’- (Metal Working)’was commenced. In the year 2018 we plan to publish the same magazine in Kannada and Hindi, along with four new books in Marathi. Read More