सुलभ यंत्रशाळा

सुलभ यंत्रशाळा
प्रगत यंत्रशाळा

प्रगत यंत्रशाळा
हस्तपुस्तक

हस्तपुस्तक

आज औद्योगिक जगतात तंत्रज्ञानाच्या पातळीवर मोठे बदल घडत आहेत. कारखान्यांमध्ये कॉम्पुटर नियंत्रित CNC यंत्रे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यासाठी आज कुशल यंत्रचालक शिकवून तयार करावे लागत आहेत. म्हणून लहान कारखान्यांसाठी असा कामगार वर्ग तयार करणे ही सध्याची व भविष्यातील निकड आहे. यासाठी औद्योगिक शिक्षण मातृभाषा मराठीतून देणे आवश्‍यक आहे.

आज सगळीकडे इंग्रजीची चलती दिसत असली तरी इंग्रजी लिहिता-वाचता-बोलता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. असे कामगार तयार करायचे झाल्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे जे विद्यार्थी सध्‍या औद्योगिक शिक्षण घेत आहेत, त्यांना मराठी माध्यमाची अभियांत्रिकीची पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी मराठी ही तंत्रज्ञानाची भाषा असली पाहिजे.

ही सध्याची गरज लक्षात घेऊन, अभियांत्रिकीची व्यावसायिक व तंत्रविषयक सुलभ व शास्त्रशुद्ध माहिती असलेले मराठी भाषेतील मासिक व पुस्तके प्रकाशित करून ते ज्ञान सर्वांपर्यंत मराठी भाषेत पोहोचविण्याचा प्रकल्प उद्यम प्रकाशन संस्थेने हाती घेतला आहे.
२०१८ वर्षात CNC मशिन्स व त्याचे प्रगत तंत्रज्ञान, सुलभ यंत्रशाळा, तसेच कारखान्यात कायम लागणारे अभियांत्रिकी संदर्भ पुस्तक(मेकॅनिकल हँडबुक) अशा विषयांवरील पुस्तके प्रसिध्‍द करणार आहे.ही पुस्तके सध्या उपलब्ध असलेल्या पुस्तकांपेक्षा अतिशय उच्च दर्जाची व उत्तम गुणवत्तेची असतील. मराठी भाषेतून अत्यंत शास्त्रशुध्‍द पध्‍दतीने लिहिलेल्या या पुस्तकांचा यंत्रचालकांना नक्कीच फायदा होईल.
या पुस्तकांचा वापर करून नवशिके कामगार कारखान्यांमध्ये स्वकौशल्याने, स्वबळावर मशिनवर काम करू शकतील असा विश्वास आम्हांला वाटतो.