महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिला आहे आणि त्याचे श्रेय शंभरहून अधिक वर्षांपूर्वी किर्लोस्करवाडीला उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लक्ष्मणराव किर्लोस्करांपासून, आज काम करीत असलेल्या प्रत्येक मराठी उद्योजकाचे आहे. हेच अग्रस्थान टिकवायचे असेल तर आज आपली स्पर्धा केवळ भारतीय उद्योजकांशी नसून जागतिक उत्पादकांशी आहे, याचे भान ठेउन आपले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण धडपडत आहेत. जगभरातून आज आपल्याकडे उत्पादक येत आहेत आणि अद्ययावत आस्थापना उभारत आहेत . या आस्थापनांत तयार होउन बाजारात जाणाऱ्या उत्पादनांना आवश्यक असलेले भाग, त्या आस्थापनेच्या आसपास असलेल्या लघु आणि मध्यम आकाराच्या कारखान्यातच बनवले जातात. उत्‍पादने आंतरराष्‍ट्रीय दर्जाची असावीत ही या आस्थापनांची अपेक्षा पूर्ण करताना आज आपल्याला सर्व पातळीवर बदल आणि सुधारणा करणे निकडीचे झाले आहे.

व्यवस्थापन पध्‍दती, कामातील कौशल्य, कच्च्या मालाची निवड आणि हाताळणी, तयार झालेल्या उत्पादांची सुरक्षित साठवणी आणि हाताळणी इ.इ.. अनेक नवी आव्हाने आपल्यापुढे येत आहेत. याबद्दल बाहेर काय चालू आहे, तांत्रिक आणि कौशल्य विकास यासंदर्भात इतर उत्पादक काय करीत आहेत, कुठली नवी हत्यारे बाजारात आली आहेत याबद्दल अद्ययावत माहिती देणारी अनेक मासिके आज बाजारात उपलब्ध आहेत, पण ती सर्व इंग्रजी भाषेत!

आज कामगाराचे कौशल्य वाढवायचे असेल, प्रत्यक्ष काम करणाऱ्या सुपरवायझर/अभियंते यांना आधुनिक तंत्रज्ञान माहीत करून द्यायचे असेल तर ते ज्ञान त्याला सहज समजेल अशा भाषेतून, म्हणजेच मातृभाषेतून देणे गरजेचे आहे. हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेउन, ‘उद्यम’सुरू करत असलेल्या मासिकाबद्दलचे आमचे विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हे निवेदन.

उद्दिष्ट –
 • लघु आणि मध्यम उद्योगातील कामगार आणि कर्मचारी यांना त्यांची कार्यशैली सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक ते ज्ञान व माहिती देणे.
 • लघु आणि मध्यम उद्योगातील(ल.म.उ) अधिकारी आणि मालक यांना नवीन तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील घडामोडींची माहिती देणे.
 • उत्पादांचा दर्जा वाढविण्यासाठी माहिती देणे.
वाचक कोण?
 • कामगार
 • पर्यवेक्षक/अभियंता
 • व्यवस्थापक/मालक
 • सर्व प्रकारच्या लघु आणि मध्यम आस्थापनातील वाचकांना समोर ठेवून केलेली रचना
मासिकात येऊ शकणारे विषय
 • तांत्रिक विषय
 • नवीन प्रक्रिया
 • प्रक्रिया सुलभीकरण
 • कामातील सुधारणा
 • नवीन उत्पादन
 • औद्योगिक वसाहत माहिती
 • बाजार स्थिती आणि व्यवसाय (Market and business), अर्थव्यवहार, कायदा
 • छोट्या जाहिराती

नवीन अंक
धातुकाम ६ – यंत्र उपसाधने नोव्हेंबर २०१७
सी. एन. सी. लेथ ऑक्टोबर २०१७
धातुकाम कार्यवस्तू पकड साधने सप्टेंबर २०१७
धातू कर्तन हत्यारे ऑगस्ट २०१७
धातुकाम मोजमापन उपकरणे जूलै २०१७
धातुकाम स्वयंचलन जून २०१७
धातुकाम यंत्र आणि तंत्र
धातुकाम यंत्र आणि तंत्र