शीतक फिल्टरेशन सिस्टिम

Udyam Prkashan Marathi    24-Dec-2019   
Total Views |

1_1  H x W: 0 x 
 
 
उद्योग यशस्वीरित्या चालण्यासाठी अनेक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. त्यापैकीच एक महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पादन खर्च. यामध्ये कच्चा माल, वेळ, मनुष्यबळ या घटकांवर होणारा खर्च समाविष्ट असतो. शीतक (कूलंट) हा अत्यंत महत्त्वाचा आणि जवळपास प्रत्येक यंत्रण करणार्‍या कंपनीमध्ये वापरला जाणारा घटक आहे. म्हणूनच त्यावर होणारा खर्चही सर्वांकरिता महत्त्वाची बाब आहे. सततच्या वापरामुळे शीतक लवकर खराब होते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. जर हे शीतक उत्पादनाच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम न करता पुन्हा पुन्हा वापरता आले तर? अर्थातच अशा उपकरणाचे कारखानदार स्वागतच करतील. म्हणूनच ‘तुमच्याकडील तेलाचा जास्तीतजास्त वापर करा’ (युज युवर ऑइल मॅक्सिमम) हा उद्देश ठेवून ऑइलमॅक्स कंपनीने विविध उद्योगांमध्ये वापरता येतील अशी उत्पादने बाजारात आणली आहेत. शीतक फिल्टरेशन सिस्टिम हे त्यापैकीच एक उपकरण आहे. 
 

2_1  H x W: 0 x 
 
सी.एन.सी. मशिन अनेक उद्योगांमध्ये वापरले जाते. एखाद्या कार्यवस्तुला हवा तसा आकार देण्यासाठी त्यावरील अतिरिक्त मटेरियल काढावे लागते. कार्यवस्तुला टूलच्या साहाय्याने आकार देत असताना टूल आणि कार्यवस्तूमध्ये घर्षण होते. हे घर्षणामुळे वाढणारे तापमान कमी करण्यासाठी तसेच मशिन कार्यक्षमपणे चालण्यासाठी शीतकाची आवश्यकता असते. जास्तीचे मटेरियल काढत असताना निघालेल्या चिप वेगवेगळ्या आकाराच्या असतात. या निघालेल्या चिप कन्व्हेअरमार्फत ट्रॉलीमध्ये टाकल्या जातात. या प्रक्रियेमध्ये काही चिप टाकीच्या आतल्या बाजूला जमा होतात. ही प्रक्रिया सातत्याने चालू असते. त्यामुळे टाकीत मोठ्या प्रमाणात चिप साठतात. या सगळ्याच्या परिणामामुळे शीतकाचे आयुष्य खूप कमी होते. त्याचबरोबर शीतकाचा महत्त्वाचा गुणधर्म असलेल्या pH मूल्याचे अपेक्षित मूल्य 8 ते 10 असते. त्यात फरक पडू शकतो. pH मूल्यामधील 0.2 बदलसुद्धा कार्यवस्तू आणि मशिनवर गंज, खराब वास अथवा कर्मचार्‍यांच्या त्वचेवर खाज अशा समस्या निर्माण करू शकतो. खराब शीतक वापरल्यामुळे टूलचे आयुष्य कमी होते, त्यासोबतच कार्यवस्तुच्या गुणवत्तेवरदेखील परिणाम होतो. यासाठी टाकी स्वच्छ राखणे आवश्यक असते. मशिनची शीतक टाकी स्वच्छ करण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागतात. यासाठी दोन कर्मचार्‍यांची गरज भासते. दर महिन्यातून एकदा एक दिवस टाकी स्वच्छ करण्यासाठी द्यावा लागतो. शिवाय जुने शीतक फेकून द्यावे लागल्यामुळे खर्च होतो, ते वेगळेच. टाकी स्वच्छ करताना जुने शीतक बाहेर टाकल्याने प्रदूषण वाढते, तसेच निसर्गाची हानी होते. वरील सर्व समस्यांचा अभ्यास करून आम्ही शीतक फिल्टरेशन सिस्टिमची निर्मिती केली आहे.
 
कार्यप्रणाली
 
सीलबंद टाकीवर अधिक सक्शन पॉवर असलेला व्हॅक्युम पंप बसविलेला असतो. सिस्टिम सुरू झाल्यावर हा पंप टाकीमध्ये निर्वात पोकळी (व्हॅक्यूम) तयार करतो. होजमार्फत शीतक खेचले जाते आणि ते सर्व एका दहा मायक्रॉनची जाळी असलेल्या बास्केटमधून जाते. या बास्केटमध्ये दहा मायक्रॉनपर्यंतच्या सर्व चिप/धातुचे कण अडकतात आणि स्वच्छ झालेले शीतक टाकीत (शीतक साठविण्याच्या एका टाकीची क्षमता साधारणतः 200 लीटर असते.) जमा होते. हे जमा झालेले शीतक पुन्हा मशिनच्या सम्पमध्ये टाकण्यासाठी डिलिव्हरी पंप दिलेला असतो. फिल्टर बास्केट सहज काढता येण्यासारखी असल्याने आवश्यकतेनुसार ती बाहेर काढून स्वच्छ करता येते.
 

3_1  H x W: 0 x 
 
वैशिष्ट्ये 
 
1. व्हॅक्यूम पंपाशी कोणत्याही प्रकारच्या शीतकाचा संपर्क येत नाही. त्यामुळे पंपाचे भाग खराब होण्याचा प्रश्न येत नाही. 
2. स्वच्छ करण्याची प्रक्रिया सहज आणि सोपी असल्याने त्यासाठी वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नाही. 
3. स्टेनलेस स्टीलची जाळी असल्याने दीर्घकाळ वापरता येते.
4. शीतकामधील ट्रॅम्प ऑइल बॅग फिल्टरमार्फत बाहेर बाहेर काढले जाते. त्यामुळे शीतकाचे pH मूल्य व्यवस्थित राखले जाते. शीतकाचे pH मूल्य कायम राहिल्याने जीवाणू तयार होत नाहीत. परिणामी शीतकाला दुर्गंध येत नाही. 
5. स्वयंचलित व्यवस्था असल्यामुळे एकच मशिन अनेक सी.एन.सी/व्ही.एम.सी. मशिनच्या टाक्या स्वच्छ करू शकते. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी युनिट नेणे सहजपणे एका व्यक्तीला शक्य होते.
 
फायदे 
 
1. अवघ्या एक महिन्यात जे शीतक खराब होते त्याचे आयुष्य तीन महिन्यांपर्यंत वाढते. यामुळे महिन्यातून एकदा शीतक बदलण्याऐवजी तीन महिन्यांनी एकदा बदलावे लागते. 
2. टाकी स्वच्छ करण्यासाठी दोन ते तीन कामगारांना दोन ते तीन तास लागतात, त्याऐवजी एक कामगार हे काम अवघ्या अर्धा तासात करू शकतो.
 

T1_1  H x W: 0  
 
ठळक वैशिष्ट्ये
 
1. शीतकातून चिप काढल्या जातात. 
2. आकाराने लहान (पोर्टेबल) मशिन
3. कोणतीही आवर्ती किंमत (रिकरिंग कॉस्ट) आणि कोणताही बदलण्यायोग्य घटकाची आवश्यकता नाही.
 
ग्राहकाचा अनुभव 
 
>टाकीची शीतक साठविण्याची क्षमता (प्रति मशिन) : 200 लिटर
>टाकीतील पाण्याचे प्रमाण 95% : 190 लिटर
>टाकीतील शीतकाचे प्रमाण 5% : 10 लिटर 
>फिल्टरेशन सिस्टिम लावण्यापूर्वी टाकीतील शीतक बदलण्याची वारंवारिता : प्रतिमहा एकदा 
>फिल्टरेशन सिस्टिम लावल्यानंतर टाकीतील शीतक बदलावे लागण्याची वारंवारिता : तीन महिन्यातून एकदा 
>कंपनीतील मशिनची संख्या - 20
 
शीतक दरमहा बदलावे लागल्यास होणारा खर्च
 
>पाणी 190 लीटर X 0.5 = 95 रुपये 
>ऑइल 10 लीटर X 100 = 1000 रुपये 
>सिस्टिम लावण्यापूर्वी टाकी स्वच्छ करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ : महिन्यातून एकदा तीन व्यक्ती. 
>त्यासाठी लागणारा खर्च : 300 रुपये 
>प्रति मशिन एकूण दरमहा खर्च : 95 + 1000 + 300 = 1395 रुपये
>प्रति मशिन वार्षिक खर्च : 1395 X 12 = 16,740 रुपये
 
तीन महिन्याने शीतक बदलल्यास होणारा वार्षिक खर्च : 1395 X 4 = 5,580 रुपये
प्रति मशिन एकूण बचत : 16,740 - 5, 580 = 11,160 रुपये 
20 मशिनसाठी एकूण वार्षिक बचत : 11,160 X 20 = 2,23,200 
 
पुरस्कार 
 
सूक्ष्म आणि लघू उद्योग क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या उद्योजकांना सिडबी आणि इकॉनॉमिक टाइम्स यांच्याकडून पुरस्कार दिले जातात. 2019 या वर्षासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान विभागामध्ये ऑइलमॅक्स सिस्टिम प्रा. लि. कंपनीला गौरविण्यात आले. 
 
 
 

ashutosh_1  H x 
आशुतोष गोखले
संचालक,
ऑइलमॅक्स सिस्टिम्स प्रा. लि. 
9881849047
 
आशुतोष गोखले विद्युत अभियंते असून, ऑइलमॅक्स सिस्टिम्स प्रा. लि. कंपनीचे
ते संचालक आहेत. त्यांना या क्षेत्रातील कामाचा 35 वर्षांचा अनुभव आहे.