स्क्वेअर शोल्डर मिलिंग

Udyam Prkashan Marathi    27-Dec-2019   
Total Views |
 
मशिनचा वापर, मनुष्यबळाचा प्रभावी वापर आणि कारखान्याचा स्थिर खर्च या सर्व गोष्टी कोणत्याही उत्पादकाचा नफा आणि स्पर्धात्मकता निर्धारित करतात. यासाठी कटिंग टूलकडून कमीतकमी वेळात दर्जेदार यंत्रभागांची निर्मिती होताना मशिनचा वेळ वाचून, प्रति दिवस अधिकाधिक यंत्रभागांचे उत्पादन होण्याची अपेक्षा असते.
 
या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही मोठे किंवा लहान, हलके किंवा जड, फिनिश किंवा रफ, साधे किंवा क्लिष्ट आदी कोणत्याही प्रकारच्या कामासाठी परिपूर्ण स्क्वेअर शोल्डर मिलिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वासाने यंत्रण करता येते. उत्कृष्ट कामगिरी साध्य करण्यासोबतच आवर्तन काळदेखील (सायकल टाइम) कमी करता येऊ शकतो. योग्य पॉझिटिव्ह रेक असणारी टूलची भूमिती प्रक्रियेदरम्यान उष्णता निर्मिती कमी करण्यास मदत करते, तसेच ऊर्जेचा कमी वापर, बरमुक्त यंत्रण, अष्टपैलुत्व (व्हर्सटॅलिटी), मानक म्हणून भिन्न त्रिज्यांची निवड, उच्च कार्यप्रदर्शन श्रेणी आणि सर्व प्रकारच्या भूमिती आणि मटेरियलच्या कार्यवस्तुंच्या यंत्रणासाठी उपयुक्त आहे.
 
इंडेक्सेबल इन्सर्ट एंड मिलच्या व्यापक अष्टपैलुत्वामुळे टूल बदलण्याचा खर्च कमी झाल्याने एकूण खर्चात बरीच बचत होते. मटेरियलमध्ये माइल्ड स्टीलपासून टायटॅनिअमपर्यंत किंवा यंत्रण प्रक्रियेत स्लॉटिंगपासून वेगवान प्रोफाइलिंगपर्यंत सहज आणि किफायतशीरपणे बदल करण्यासाठी अनेकदा तीच कटर बॉडी वापरून, फक्त इन्सर्ट ग्रेड किंवा भूमितीमधील साधा बदल आवश्यक असतो. तसेच एंड मिल वापरताना खूप जास्त यंत्रणवेग आणि सरकवेग वापरले जात असल्यामुळे उच्च उत्पादनक्षमता मिळविता येते. 
 

1_1  H x W: 0 x 
 

2_1  H x W: 0 x 
 
 
टर्बो इन्सर्ट आणि कटर
 
आकार आणि ऑपरेशनच्या विस्तृत श्रेणीमध्ये स्क्वेअर शोल्डर मिलिंग कामासाठी टर्बो प्रकारचे मिल वापरणे किफायतशीर ठरते, कारण त्याच्या पॉझिटिव्ह कटिंग रेक डिझाइनमुळे केवळ विजेचा वापर कमी होत नाही, तर यामुळे टूलचे आयुर्मान आणि यंत्रणाचे (कटिंग) पर्याय वाढतात. प्रत्येक टर्बो कटरमध्ये उच्च उत्पादकता, क्षमता आणि अष्टपैलुत्व अंतर्भूत असतेच. उच्च पॉझिटिव्ह इन्सर्टमुळे यंत्रण बले कमी होतात आणि त्यामुळे चांगला पृष्ठीय फिनिशही मिळतो. टर्बो कटरच्या दृढ डिझाइनमुळे उच्च कार्यक्षमता आणि चांगली विश्वासार्हता मिळते, तसेच उच्च सरकवेग हाताळता येतो. काही वर्षांपासून वापरात असलेल्या दोन कडांच्या XOMX इन्सर्टमध्ये आता भिन्न भूमिती आणि ग्रेड उपलब्ध आहेत, त्यामुळे सर्व प्रकारच्या मटेरियलमध्ये रफिंगपासून फिनिशिंगपर्यंत काम करणे शक्य होते.
 
उष्णता प्रतिरोधक धातुंचे मिश्रण (सुपर अलॉय), अ‍ॅल्युमिनिअमसारख्या घटकांच्या यंत्रणावेळी तयार होणारी उष्णता कमी करण्यासाठी उच्च पॉझिटिव्ह रेक असणार्‍या इन्सर्टची आवश्यकता असते. आमच्याकडील स्क्वेअर शोल्डर सिस्टिममध्ये चार आणि सहा यंत्रण कडा असलेले इन्सर्ट आहेत ज्यांची निवड मटेरियल, मशिन, यंत्रभागाचे वैशिष्ट्य आणि इतर घटकांच्या आधारे केली जाते. 
 

3_1  H x W: 0 x 
 
आपल्याला हे उघड्या डोळ्यास दिसू शकणार नाही, परंतु टर्बोच्या अनन्य (युनिक) इन्सर्टची जवळून तपासणी केल्यावर त्यात इष्टतम कड (ऑप्टिमाइज्ड् एज), अ‍ॅडव्हान्स्ड् हेलिक्स कोन, मोठा वायपर फ्लॅट आणि एक मजबूत, अत्यंत पॉझिटिव्ह रेक कोन असल्याचे आढळेल. त्यामुळे स्क्वेअर शोल्डर मिलिंगमध्ये उत्पादकतेची उच्च पातळी गाठणे शक्य होते. आपल्याला यात स्लॉट, रॅम्प, कंटूर, प्लंज, पॉकेट मिल आणि (गोलाकार आणि हेलिकल, असे दोन्ही प्रकारचे) इंटरपोलेशन अशी विविध कार्ये करण्याचा अष्टपैलुपणादेखील मिळतो. हे इन्सर्ट सर्व मटेरियलच्या कार्यवस्तूंचे यंत्रण करण्यासाठी आणि नॉन फेरस मिश्रधातुंपासून ते उष्मा प्रतिरोधक मिश्र धातूपर्यंतच्या सर्व अ‍ॅप्लिकेशनमध्ये काम करण्यासाठी विविध प्रकारच्या श्रेणी आणि भूमितीमध्ये उपलब्ध आहेत.
 
स्टँडर्ड XOMX इन्सर्टवर हवे असलेले क्लिष्ट आकार आणि पृष्ठभाग तयार करण्यासाठी, सेको प्रगत डायरेक्ट प्रेस इन्सर्ट उत्पादन कार्यपद्धतीचा वापर करते. ज्या ठिकाणी विशिष्ट कड आवश्यक असते त्या ठिकाणी सेकोतर्फे अचूक ग्राइंड केलेले XOEX इन्सर्ट उपलब्ध असतात. तसेच, जिथे यंत्रभागांची रचना आणि मजबूती अत्यंत महत्त्वपूर्ण असते, अशा एअरोस्पेस उद्योगक्षेत्राची मागणी पूर्ण करण्यासाठी कॉर्नर त्रिज्येचे पर्यायदेखील (अधिक शक्तीसाठी अधिक त्रिज्या) आमच्या विस्तृत टर्बो श्रेणीचा एक भाग आहेत.
 
टर्बो इन्सर्ट 06 मिमी., 10 मिमी., 12 मिमी. आणि 18 मिमी. अशा वेगवेगळ्या चार आकारांत उपलब्ध असून, त्यांना अनुक्रमे नॅनो टर्बो, टर्बो 10, सुपर टर्बो आणि पॉवर टर्बो नावाने परिभाषित केलेले आहे. कापाची खोली आणि मशिनच्या विद्युत शक्तीच्या उपलब्धतेनुसार, इन्सर्टच्या परिणामकारक उपयोगासाठी आपण कटरची निवड करू शकतो. टर्बो श्रेणीतील सर्वात लहान असलेल्या नॅनो टर्बोची कामगिरी मात्र महान असून नॅनो टर्बोचा व्यास 10 मिमी.पासून सुरू होतो. एच.एस.एस. आणि सॉलिड कार्बाइड या दोन्हीसाठी नॅनो परिपूर्ण पर्याय आहे. 
 
समायोजित (अ‍ॅडजस्टेबल) कटरला जोडलेले, भिन्न पिच असलेले, विविध व्यास असलेले कटर आमच्याकडे एक स्टँडर्ड श्रेणी म्हणून उपलब्ध आहेत. दंडगोलाकार शँक, आर्बर डिझाइन आणि कॉम्बी मास्टर डिझाइनमध्ये कटर उपलब्ध आहेत. कॉम्बी मास्टरचे हेड बदलण्याजोगे (रिप्लेसेबल) असतात आणि त्यांच्यामुळे एकूण व्यवस्थेला अष्टपैलुत्व आणि लवचीकता मिळते.
 
स्क्वेअर 6TM इन्सर्ट आणि कटर
 
सेको टूल्सचे ‘स्क्वेअर 6TM ’ इन्सर्ट उद्योगात आघाडीवर असणार्‍या टर्बो ग्रेडला पूरक आहेत. बहु कडा असलेल्या (मल्टी एज्ड्) इन्सर्ट पर्यायावर आधारित एक स्क्वेअर शोल्डर मिलिंग व्यवस्था विकसित करणे, हे सेकोच्या संशोधन आणि विकास (R & D) कार्यगटाचे लक्ष्य होते. ही उपाययोजना विस्तृत अ‍ॅप्लिकेशनचे क्षेत्र हाताळण्यास पुरेशी लवचीक, वाढीव सरकवेग हाताळण्यासाठी पुरेशी मजबूत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्यंत किफायतशीर असावी, हेही त्यांचे ध्येय होते.
 
स्क्वेअर 6TM चौरस शोल्डर मिलिंगच्या अनन्य इन्सर्टमध्ये सहा यंत्रण कडा असतात. प्रत्येक बाजूवर तीन 90° च्या कडा असतात. प्रत्येक कडेद्वारे अचूक 90° कट घेता येतो, त्यामुळे 90° ची बाजू मिळविण्यासाठी दोन यंत्रण प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाहीशी होते. या इन्सर्टची ISO प्रणालीनुसार X वर्गीकरणात बसणारी एक नावीन्यपूर्ण त्रिकोणीय रचना आहे. नवीन डिझाइन केलेल्या कटर बॉडीला इष्टतम टिकाऊपणा आणि गंज प्रतिकार देण्यासाठी लेपन (कोटिंग) केलेले आहे. पूर्व कठिणीकरण (प्री हार्डनिंग) केले असल्याने हा इन्सर्ट अत्यंत कडक आहे आणि त्यामुळे पॉकेटमध्ये यंत्रण करताना चांगले टॉलरन्स मिळविता येतात. स्क्वेअर 6TM मधील उपलब्ध इन्सर्ट आणि कटर बॉडीच्या विस्तृत श्रेणीमुळे त्याच्या अ‍ॅप्लिकेशन आणि कार्यवस्तुच्या मटेरियल बाबतीतील अष्टपैलुपणामध्ये आणखी वाढ झाली आहे.
 
हेलिकल मिलिंग कटर, टर्बो इन्सर्टचा वापर करते आणि उच्च हेलिक्स डिझाइनमुळे यंत्रण कार्य सुलभ होते. यामुळे यंत्रण बल कमी होऊन विजेचा वापरही कमी होतो.
 

4_1  H x W: 0 x 
 

5_1  H x W: 0 x 
 
बहु कडा असलेले टूल बाजारात उत्तमप्रकारे प्रचलित झाले आहेत. परंतु स्क्वेअर 6TM शोल्डर मिलिंगची स्वतःची वेगळी अशी श्रेणी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील गुणधर्म आणि क्षमता, सिद्ध तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण डिझाइन पर्यायांच्या संयोजनाचा परिणाम आहे. स्क्वेअर 6TM वापरून यंत्रण कार्यात शोल्डर मिलिंगमध्ये पुढे बरेच काही करणे शक्य आहे. यामध्ये स्लॉटिंग, स्लॉटिंग आणि प्लंजिंग यांचा समावेश आहे. हे स्क्वेअर शोल्डर कटर फेस मिलिंगसाठीही वापरू शकतो, ज्याने या उत्पादाचे अष्टपैलुत्व सिद्ध होते.
 
स्क्वेअर 6TM मध्ये सहा यंत्रण कडा असल्याने प्रति यंत्रण कडेचा खर्च कमी ठेवता येतो. पॉकेट सीटवरील अक्षीय रेक निगेटिव्ह आहे, परंतु इन्सर्टवरील पॉझिटिव्ह यंत्रण कड कटिंग रेक कोन पॉझिटिव्ह करते. त्यामुळे उच्च कार्यक्षमता सुनिश्चित होते. 
 
वैशिष्ट्ये
 
90° सेटिंग कोन असलेला स्क्वेअर 6TM कटर. 
एका ऑपरेशनमध्ये अचूक 90° स्क्वेअर मिळविता येतो. 
वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बाजूंचे यंत्रण करताना कोणतेही फरक आढळत नाहीत. 
लेपन केलेल्या कटर बॉडीमुळे टूलचे आयुर्मान वाढते. 
पूर्व कठीणीकरण केलेली कटर बॉडी आणि परिमितीवर ग्राइंड केलेले इन्सर्ट अधिक चांगले टॉलरन्स आणि अधिक विश्वसनीयता देतात. 
यंत्रण केलेल्या भागांवर उच्च अचूकता आणि टॉलरन्स 
एकाच टूलचा उपयोग करून किफायतशीरपणा आणि कामगिरी शक्य.
स्क्वेअर 6TM कटर 6-04 आणि स्क्वेअर 6-08 या दोन इन्सर्ट स्क्वेअर आकारांत उपलब्ध आहेत. याची निवड कापाच्या खोलीच्या आधारे केली जाऊ शकते. 
 
हे कटर खडबडीत (कोअर्स), सामान्य (नॉर्मल) आणि क्लोज पिच शैली अशा तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. भूमिती, ग्रेड आणि कोपरे त्रिज्या यांचे वैविध्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने स्क्वेअर 6TM कटर या क्षेत्रात सर्वात यशस्वी मानले जातात. 
 
बर्‍याच ग्राहकांसाठी कटिंग टूल निवडताना केवळ किंमत हा महत्त्वाचा निकष नसतो, तर त्या टूलद्वारे किती यंत्रण करता येते आणि परिणामस्वरूपे त्याच्या किंमतीच्या मानाने ते टूल किती उत्पादनक्षम असू शकते, याचा प्रामुख्याने विचार केला जातो. ही उद्दिष्टे साध्य करता यावी यासाठी सेको कंपनी ग्राहकांसाठी भागीदार म्हणून काम करीत आहे.
 
केस स्टडी
 

T1_1  H x W: 0  
 
मशिन : मझाक व्ही.एम.सी. 
मटेरियल : SS316L
ऑपरेशन : खाच करणे आणि स्क्वेअर शोल्डर मिलिंग 
ग्राहकाचा फायदा : उत्पादकता 100 टक्क्यांनी सुधारली तर टूलच्या आयुर्मानात 50 टक्के वाढ झाली. कडेच्या झिजेचा आधी अंदाज मिळू लागल्याने प्रक्रिया अधिक सुरक्षित झाली.
 
 

Rajesh Gupta_1   
राजेश गुप्ता
उप महाव्यवस्थापक, मिलिंग अँड अ‍ॅडव्हान्स मटेरियल विभाग, सेको टूल्स इंडिया प्रा. लि. 
9822604996
 
राजेश गुप्ता यांत्रिकी अभियंते असून, सेको टूल्स इंडिया प्रा. लि. कंपनीमध्ये मिलिंग अँड अ‍ॅडव्हान्स मटेरियल विभागाचे ते उप महाव्यवस्थापक आहेत. त्यांना यंत्रण क्षेत्रातील कामाचा 25 वर्षांचा अनुभव आहे.