शॉप फ्लोअर मेट्रॉलॉजीः संनियंत्रण आणि उपाययोजना

Udyam Prkashan Marathi    31-Jan-2020
Total Views |
  
 
मिलिंग आणि मशिनिंग सेंटर
 
मशिनिंग सेंटर आणि मिलिंग मशिनवर काम करताना योग्य उपकरणे वापरून पुढील कामांची तपासणी 
करता येते. 
मशिनिंग सेंटरवर यंत्रभागाची परिमाणे आणि स्थान यांची तपासणी
अचूक तपासणीसाठी डायमंड लाइन
मशिनिंग सेंटरवर टूल सेटिंग आणि भौमितिक तपासणी
मशिनिंग सेंटरवर टूल तुटणे
मशिनचे संरक्षण
टूल आणि प्रक्रिया संनियंत्रण
मशिन संनियंत्रण
 
मशिनिंग सेंटरवर यंत्रभागाची परिमाणे आणि स्थानाची तपासणी
मिलिंग मशिन आणि मशिनिंग सेंटर वापरून केलेल्या यंत्रणातील चुकांमुळे नाकारल्या जाणार्‍या (स्क्रॅप) यंत्रभागांची निर्मिती ही उत्पादन क्षेत्रामधील मुख्य समस्या आहे. ही समस्या टाळण्याचा एक मार्ग म्हणजे कार्यवस्तू मशिनच्या टेबलवर कशी ठेवली आहे, हे जाणून घेणे (मशिनच्या अक्षांच्या संदर्भात वास्तविक स्थान) आणि यंत्रण प्रक्रियेनंतर कार्यवस्तूंचे त्वरित मापन/तपासणी करणे. या प्रकारची तपासणी करण्यासाठी, मशिनला पार्ट प्रोबिंगद्वारा (टच प्रोब + बोअर गेज) सुसज्ज करणे आवश्यक आहे.
 

1_1  H x W: 0 x 
 
मशिनिंग सेंटरवर परिमाणांचे मोजमाप करणे सोपे, शीघ्र आणि अचूक कधीच नव्हते.
मारपॉसची WRG बोअर गेज सामान्य टूलप्रमाणेच वापरली जातात आणि यंत्रण केलेल्या भागांचे मितीय (डायमेन्शनल) नियंत्रण करण्यासाठी टूल, मॅगझिनमधून मशिनच्या स्पिंडलमध्ये लोड केली जातात. त्यांचा मजबूतपणा आणि मापनातील अचूकपणा मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी (मास प्रॉडक्शन) परिपूर्ण आणि उपयुक्त असतो. अंतिम वापरकर्त्याच्या मापनाच्या आवश्यकतेनुसार त्यांच्यात सहजपणे फेरफार करता येतात.
 
मिलिंग मशिन किंवा मशिनिंग सेंटरमध्ये ज्या परिस्थितीमध्ये यंत्रण (कटिंग) होते त्याच वातावरणात केली जाणारी मापनाची कामे पार्ट प्रोबिंगद्वारा केली जातात. अशा प्रकारे, ऑपरेटरला सी.एम.एम.द्वारे मिळणारी माहिती अतिशय वेगवान आणि अर्थपूर्ण मार्गाने मिळते. हे खरं आहे की सी.एम.एम. अतिशय तंतोतंत मापन करते, परंतु मशिनच्या आत यंत्रभाग कसा पकडला आहे याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. त्याशिवाय, भिन्न पर्यावरणीय परिस्थितीदेखील यंत्रणाच्या पॅरामीटरवर परिणाम करू शकते.
 
पार्ट प्रोबिंग अ‍ॅप्लिकेशन कार्यवस्तुचा सेटअप आणि यंत्रभागाची तपासणी अशा दोन प्रकारच्या तपासण्या करते. कच्च्या मालाच्या तुकड्याचे स्थान, त्याची सुरुवात आणि अभिमुखता (ओरिएंटेशन) नक्की काय आहे, हे यंत्रण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे. याबाबत माहिती नसणे किंवा चुकीची माहिती असल्यास यंत्रभागाचे टॉलरन्सच्या बाहेर यंत्रण होण्याचा धोका निर्माण होतो. त्याशिवाय कार्यवस्तुचा सेटअप जाणून घेतल्यामुळे यंत्रण झाल्यावर नाकारलेल्या यंत्रभागांमध्ये लक्षणीय घट होते.
 

2_1  H x W: 0 x 
 
मशिनिंग सेंटरवरच यंत्रभागाची तपासणी म्हणजे यंत्रणानंतर लगेच केली जाणारी मितीय तपासणी असते. वरील दोन्ही तपासण्या केल्याने वापरकर्त्यास पुढील गोष्टी समजतात. 
भाग (पार्ट) टॉलरन्समध्ये आहे आणि पुढील प्रक्रियेत जाऊ शकतो.
यंत्रभागाची परिमाणे यंत्रचित्रात दिलेल्या परिमाणांपेक्षा वेगळी आहेत, म्हणून त्यासाठी आणखी यंत्रण आवश्यक आहे.
> यंत्रभाग योग्यपणे बनविला गेलेला नाही आणि टॉलरन्सच्या बाहेर आहे. 
एखादा खराब यंत्रभाग त्वरित काढून टाकल्याने त्याच्यावर केली जाणारी पुढील प्रक्रिया टाळली जाते.
 
फायदे
मशिनवरच कार्यवस्तूचे मापन केले जाते.
कामासाठी आणि तपासणीसाठी लागणारा वेळ कमी होतो.
उत्पादनक्षमता वाढते. 
यंत्रभागाच्या स्थानाची तत्क्षणी (रियल टाइम) निश्चिती होते.
भंगार मालाची निर्मिती कमी होते.
 
प्रकार 
प्रत्येक मिलिंग मशिन आणि मशिनिंग सेंटरला पार्ट प्रोबिंग अ‍ॅप्लिकेशनच्या परिपूर्ण उपाययोजना उपलब्ध करून विभिन्न आकाराच्या यंत्रभागांचे मापन करता येते.
 
> ऑप्टिकल ट्रान्स्मिशन टच प्रोब 
लहान आणि मध्यम परिमाणांच्या मशिनसाठी योग्य.
 
> रेडिओ ट्रान्स्मिशन टच प्रोब
मिलिंग मशिन आणि मशिनिंग सेंटरसाठी प्रोब, मोठ्या भागांचे यंत्रण करताना वापरण्यासाठी योग्य.
 
> वायरलेस बोअर गेज
 
> स्कॅनिंग प्रोब
नुकत्याच यंत्रण केलेल्या मशिनच्या प्रोफाइलची अचूकता सत्यापित (व्हॅलिडेट) करण्यासाठी आणि पृष्ठभागावरील दोष थेट मशिनवरच ओळखण्यासाठी उपयुक्त.
 
याव्यतिरिक्त, मारपॉस प्रत्येक पार्ट प्रोबिंग अ‍ॅप्लिकेशनसाठी समर्पित (डेडिकेटेड) मापन सॉफ्टवेअर विकसित करते.
 

3_1  H x W: 0 x 
 
अतिशय अचूक तपासणीसाठी डायमंड लाइन
आजपर्यंत मशिनसाठी मापनाच्या कामगिरीतील सर्वोत्तम पातळीवरील अचूक प्रोबिंग उपाययोजना आम्ही पुरवित आलो आहोत. सतत नाविन्यपूर्ण सुधारणा करीत राहणे आणि वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करणे, हा मारपॉसचा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. याचा परिपाक म्हणजेच मारपॉसने नुकतीच बाजारात आणलेली हाय प्रिसिजन प्रोबिंग ही उच्चस्तरीय अचूकतेच्या उत्पादनांची नवीन श्रेणी होय. हाय प्रिसिजन प्रोबिंगद्वारे ग्राहकांना टूल, प्रीसेटिंग, सत्यापन, कार्यवस्तू सेटअप आणि यंत्रभाग तपासणीची एक अतिशय अचूक सुविधा उपलब्ध झाली आहे.
 
स्पिंडल प्रोब
पिझोइलेक्ट्रिक तंत्रज्ञान वापरून हाय प्रिसिजन स्पिंडल प्रोब स्वयंचलितपणे मशिन अक्षाच्या स्थानाचा शोध घेतात. कोणत्याही आकाराच्या मशिनिंग सेंटर किंवा मिलिंग मशिनवर यंत्रभाग नियंत्रण आणि स्थाननिश्चिती यांच्यासाठी उत्कृष्ट मापन कामगिरीची हमी देतात. याव्यतिरिक्त परिमाणे, डिझाइन आणि ट्रान्स्मिशन मोडमध्ये वैविध्य (हार्ड वायर्ड, ऑप्टिकल आणि रेडिओ) असलेली कित्येक मॉडेल उपलब्ध आहेत.
 
टूल सेटर
व्हिज्युअल टूल सेटर (VTS) हे मापन करण्यासाठी कॅमेरा वापरणारे टूल सेटर आहे. VTS द्वारा पृष्ठभागाची अखंडता तपासता येते. या वैशिष्ट्यामुळे त्याला टूलमधील किरकोळ बिघाड स्कॅन करणारे, पुढच्या टोकापासून मागच्या भागापर्यंत संपूर्ण टूल तपासणारे, एकमेव व्हिज्युअल टूल सेटर म्हणता येईल. कार्यवस्तू आणि एकंदर उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी सी.एन.सी. मशिनवरील टूलची प्रोफाइल तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते.
 

4_1  H x W: 0 x 
 
समर्पित सी.एन.सी. मापन आवर्तनांद्वारे खर्‍या (ट्रू) व्यासाची पडताळणी केली जाते. इतर कोणत्याही स्पर्शरहित (नॉन काँटॅक्ट) टूल सेटरपेक्षा हे खूपच वेगवान आहे. स्पिंडल इंडेक्सिंग वापरून सर्व कटरसाठी प्रत्येक कटरच्या कोनीय स्थानावर लांबी, व्यास आणि कडेची अखंडता तपासता येते. 
 
फायदे
उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा 
उत्पादनक्षमतेत वाढ
उच्च अचूकतेमुळे भंगारामध्ये घट
जटिल आणि अगदी शिल्पकला केलेल्या पृष्ठभागावरदेखील अविश्वसनीय अशी मोजमापाची कामगिरी
आवर्तन काळात अजून कपात करण्यासाठी शीघ्र गती तपासणी
प्रत्येक मशिन प्रकार आणि अ‍ॅप्लिकेशनसाठी उपायांची विस्तृत श्रेणी
 
प्रकार 
T25P एक केबल वायर्ड प्रोब आहे. यामुळे आटोपशीर परिमाणे मिळतात आणि ग्राइंडर आणि शार्पनरवर वापरण्यासाठी हा एक अचूक पर्याय आहे.
VOP40P एक ऑप्टिकल ट्रान्स्मिशन असलेला कॉम्पॅक्ट प्रोब आहे. हा उच्च अचूकतेच्या लहान आणि मध्यम आकाराच्या मशिनिंग सेंटर किंवा मिलिंग मशिनसाठी आदर्श आहे.
WRP45P आणि WRP60P हे रेडिओ ट्रान्स्मिशन प्रोब आहेत, मॉड्यूलर डिझाइनवर आधारित, उच्च अचूकतेचे मिलिंग मशिन आणि 5 अक्षीय मशिनिंग सेंटरसाठी आदर्श. रेडिओ ट्रान्स्मिशन असल्याने मोठ्या आकाराच्या मशिनसाठी ते अत्यंत योग्य असतात. 1 मीटरपर्यंतच्या प्रोब एक्स्टेन्शनचा वापर करून त्यांना ग्राहकानुरूप (कस्टमाइझ) करणे शक्य आहे.
 
मिलिंग मशिन किंवा मशिनिंग सेंटरमध्ये ज्या परिस्थितीमध्ये यंत्रण (कटिंग) होते त्याच वातावरणात केली जाणारी मापनाची कामे पार्ट प्रोबिंगद्वारा केली जातात. अशा प्रकारे, ऑपरेटरला सी.एम.एम.द्वारे मिळणारी माहिती अतिशय वेगवान आणि अर्थपूर्ण मार्गाने मिळते.
 
VTS श्रेणी
यामध्ये विविध मॉडेल असून टूल व्यास विस्तृत व्याप्तीमध्ये उपलब्ध आहेत.
VTS SF45, VTS SF45 कॉम्पॅक्ट आणि VTS SF85 (स्मॉल फील्ड मॉडेल) 0.0001 मिमी. रिझोल्युशनसह कमीतकमी 0.01 मिमी. आणि जास्तीतजास्त 80 मिमी.पर्यंतची टूल मोजण्यास सक्षम आहेत.
VTS WF45 आणि VTS WF85 मध्ये (वाइड फील्ड मॉडेल) 0.04 मिमी. ते 3 मिमी. व्यासाच्या (दुहेरी बाजू) आणि 80 मिमी.पर्यंत (एकल बाजू) विस्तृत रेंजमध्ये मोजण्याची क्षमता आहे.
 
मशिनिंग सेंटरवर टूल सेटिंग आणि भौमितिक तपासणी
मिलिंग मशिन आणि मशिनिंग सेंटरवर काम करणार्‍या लोकांना तुटलेली, झिजलेली किंवा योग्य प्रकारे मापन न केलेली टूल वापरून तयार केल्या जाणार्‍या यंत्रभागांतील वाया जाण्याची समस्या माहिती असते. अंतिम वापरकर्ते किंवा ऑपरेटर यांना कामाच्या दरम्यान योग्य उत्पादन निर्मितीसाठी मूलभूत माहिती देणारी योग्य उपकरणे उपलब्ध नसतात. यंत्रण प्रक्रियेच्या आधी, दरम्यान आणि नंतर ऑटो टूल सेटिंग केल्याने कटर आणि ड्रिल यांची लांबी तसेच व्यास यांचे अचूक मूल्य स्वयंचलितपणे मिळविता येते. टूल सेटर मशिनच्या कार्यक्षेत्रात, वास्तविक यंत्रणाच्या परिस्थितीत टूलचे मापन करतात. अशाप्रकारे केलेली टूलची तपासणी मशिनच्या बाहेरील प्रीसेटिंगपेक्षा अधिक अर्थपूर्ण आणि वेगवान बनते.
टूल सेटर प्रीसेटिंग आणि टूल सत्यापन (व्हॅलिडेशन) हे दोन मूलभूत मापन टप्पे सक्षम करते.
 

5_1  H x W: 0 x 
 
यंत्रण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मशिनवर टूलचे मापन केले जाते, हा प्रीसेटिंग टप्प्याचा मुख्य फायदा आहे. यामुळे अक्षांच्या हालचालींतून वास्तविक (टूल परिमाणांच्या पुस्तकी गणनेमधून मिळणारी नाही) परिमाणे मिळतात. याबरोबरच, स्पिंडलमध्ये टूलचे क्लॅम्पिंग चुकीचे केल्यामुळे होणार्‍या रनआउटसारख्या त्रुटी लक्षात येतात आणि त्यांची भरपाई करणे शक्य होते.
कटिंग गुणवत्ता नियंत्रणात ठेवण्यासाठी टूल सत्यापनाद्वारा कटर आणि ड्रिलची झीज किंवा वेगवेगळ्या प्रक्रियांच्या दरम्यान झालेली मोडतोड पाहणे शक्य होते. त्याशिवाय, टूलच्या लांबीवर प्रभाव टाकू शकणार्‍या औष्णिक बदलांची भरपाईसुद्धा करता येते.
 
फायदे
उत्पादन गुणवत्तेत वाढ होते.
उत्पादन गुणवत्तेची स्थिर पातळी राखणे शक्य होते.
बाह्य किंवा मानवी टूल तपासणीच्या तुलनेत वेळेची बचत होते.
मशिनची उत्पादकता वाढते.
वास्तविक कामादरम्यान तपासणी केली जात असल्याने अधिक अचूक मोजमापे मिळतात. 
कामाच्या दोन टप्प्यांच्या दरम्यान टूल तपासण्याची शक्यता असते.
मोजलेल्या मूल्यांचे स्वयंचलित संपादन केले जाते आणि टूल टेबल अपडेट होते.
ऑपरेटरच्या कामात सुलभता येते.
सी.एन.सी.वर मापन मूल्ये हाताने प्रविष्ट करण्यात होणार्‍या मानवी चुका टाळल्या जातात.
 
प्रकार 
कामादरम्यान उद्भवणार्‍या कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये उपयुक्त असणारे विविध प्रकारचे टूल सेटर मारपॉसने सादर केले आहेत. 
 
> काँटॅक्ट टूल सेटिंग
दोन्ही वायरलेस आणि वायर्ड अ‍ॅप्लिकेशनमध्ये, कमीतकमी 1 मिमी. व्यासाच्या स्थिर किंवा फिरणार्‍या टूलचे मापन करता येते. प्रीसेटिंग करून व्यास आणि लांबी यांची मूल्ये मिळविता येतात आणि टूलच्या अखंडतेची तपासणी करता येते.
 

6_1  H x W: 0 x 
 
> नॉन काँटॅक्ट टूल सेटिंग
1 मिमी. पेक्षा कमी असलेल्या टूलचे मापन किंवा अधिक जटिल मोजमाप करण्यासाठी उपयुक्त (उदाहरणार्थ, रनआउट, कटर प्रोफाइलची अखंडता तपासणी)
 

7_1  H x W: 0 x 
 
> व्हिजन टूल सेटिंग
मायक्रो टूलसाठी आणि अत्युच्च दर्जाची मेट्रॉलॉजिकल कामगिरी आवश्यक असणार्‍या अ‍ॅप्लिकेशनसाठी (2 मायक्रॉनपेक्षा कमी मोजमाप अचूकता) आदर्श आहे.
 
यंत्रण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मशिनवर टूलचे मापन केले जाते, हा प्रीसेटिंग टप्प्याचा मुख्य फायदा आहे. यामुळे अक्षांच्या हालचालींतून वास्तविक (टूल परिमाणांच्या पुस्तकी गणनेमधून मिळणारी नाही) परिमाणे मिळतात. 
  
मशिनिंग सेंटरवर टूल तुटणे
यंत्रणादरम्यान टूल तुटण्याची घटना लक्षात न आल्यास उत्पादनामध्ये विनाशकारी परिणाम होऊ शकतात. टूल खराब होण्याच्या क्षणापासून त्याच्याद्वारे कापलेला प्रत्येक यंत्रभाग चुकीचाच असेल. मानवरहित उत्पादनाच्या बाबतीत हा मुद्दा अधिक गंभीर असतो, कारण तिथे ऑपरेटरला अशी समस्या समजायला बरेच तास लागू शकतात. तसेच बोअरिंगसारख्या प्रक्रियांमध्ये, टूल तुटल्यानंतर त्या कार्यवस्तूवर वापरल्या गेलेल्या नव्या टूलचे नुकसान होण्याची शक्यता असते, कारण त्यांना अपेक्षेपेक्षा आणि त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त मटेरियल बाहेर काढावे लागते.
 
अशा प्रकारचा अपव्यय आणि खर्च टाळण्यासाठी यंत्रण प्रक्रियेनंतर संभाव्य तुटणे ओळखण्यास सक्षम अशी प्रभावी टूल इंटिग्रिटी चेक सिस्टिम वापरून मशिनला सुसज्ज करणे अनिवार्य आहे.
 
तुटलेले टूल शोधण्यासाठी आणि अखंडता तपासणीसाठी आम्ही निरनिराळे पर्याय उपलब्ध करून देतो. अशा प्रणाली इन्स्टॉल आणि सेट करण्यासाठी सोप्या असतात आणि अत्यंत वेगवान सॉफ्टवेअर सायकलसह काम करतात. अशाप्रकारे आपल्या कामाच्या गुणवत्तेची हमी मिळते आणि त्याचवेळी, आवर्तन काळही इष्टतम (ऑप्टिमाइज) केला जातो.
 
तुटलेले टूल शोधण्यासाठी असलेली मारपॉसची उपकरणे प्रारंभिक संदर्भ म्हणून टूल टेबलमधील परिमाणे घेतात आणि नंतर त्यांना ऑपरेटरद्वारे जास्तीतजास्त स्वीकार्य मोडतोड टॉलरन्स व्याख्या (किमान मूल्य 0.1 मिमी.) आवश्यक असते. यंत्रणानंतर तपासणी केली जाते. जर टॉलरन्सपेक्षा अधिक मोडतोड आढळली तर खराब झालेले टूल बदलण्यासाठी एक धोक्याचा इशारा (अलार्म) दिला जातो, ज्याच्यामुळे उत्पादनातील समस्या टाळली जाते. 
 

8_1  H x W: 0 x 
 
फायदे
> उत्पादनच्या गुणवत्तेत वाढ होते.
> मशिनची उत्पादकता वाढते.
> खासकरून मानवी हस्तक्षेपाविरहित निर्मितीतील भंगार कमी होते.
> कामाच्या दोन टप्प्यांच्या दरम्यान टूल तपासण्याची शक्यता असते.
> टूल अखंडतेची स्वयंचलित तपासणी होते. 
> शीघ्र तपासणी शक्य. 
> ऑपरेटरच्या कामात सुलभता येते.
 

9_1  H x W: 0 x 
 
प्रकार 
तुटलेले टूल शोधण्यासाठी विविध प्रणाली उपलब्ध आहेत.
काँटॅक्ट टूल सेटर, अतिशय मोठ्या आकाराच्या टूलसाठी आदर्श (किमान व्यास 1 मिमी.) 
हार्ड वायर्ड आणि वायरलेस ट्रान्स्मिशन (रेडिओ आणि ऑप्टिकल) दोन्ही प्रकारात उपलब्ध. 
टूल ब्रेकेज डिटेक्टर (TBD), अक्षीय अखंडता तपासणीसाठी समर्पित उत्पादन, मुख्यत: भरीव बॉडीच्या टूलसाठी (उदाहरणार्थ, ड्रिल आणि टॅपिंग टूल). एका सेकंदापेक्षा कमी वेळात 0.15 मिमी.पर्यंत लहान टूलमधील मोडतोड ओळखण्यास ते सक्षम आहे.
मिडा लेझर, नॉन काँटॅक्ट प्रणालीद्वारे अखंडता तपासणीशिवाय भिन्न मोजमापे आणि कटर प्रोफाइल स्कॅनिंग करता येते.
व्हिजन टूल सेटिंग : मायक्रो टूलसाठी आणि अत्युच्च दर्जाची मेट्रॉलॉजिकल कामगिरी आवश्यक असणार्‍या अ‍ॅप्लिकेशनमध्ये (2 मायक्रॉनपेक्षा कमी मोजमाप अचूकता) आदर्श.
 
मशिन संरक्षण
प्रक्रियेतील इतर सर्व अडथळ्यांव्यतिरिक्त, हलणारा अक्ष आणि फिक्श्चर, टेबल किंवा कार्यवस्तू असे इतर घटक यांच्यामधील टक्कर, प्रदीर्घ मशिन डाउन टाइम आणि मोठा दुरुस्ती खर्च यांस कारणीभूत असते. टक्कर झाल्यानंतर होणारे नुकसान कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच या प्रणालींसाठी प्रतिक्रियेची वेळ (रिअ‍ॅक्शन टाइम) अत्यंत महत्त्वाची आहे. स्पिंडल किंवा मशिनच्या इतर भागांचे नुकसान टाळण्यासाठी एन.सी.ची आणि मशिनची स्वतःची ओव्हरलोड शोध यंत्रणा पुरेशी वेगवान नसते. मशिनच्या सेटअप किंवा ऑपरेशनमधील चुकांमुळे टक्कर होणे हा एक अपरिहार्य परिणाम आहे. SRTIS संनियंत्रण प्रणाली सर्वात आधी चालक शक्ती रोखण्यास सुरुवात करतात आणि अशाप्रकारे नुकसान किमान पातळीवर ठेवतात.
 

10_1  H x W: 0  
 
या आटोपशीर प्रणालींमध्ये इलेक्ट्रॉनिक मोड्यूल, संवेदक (सेन्सर) आणि कॉन्फिगरेशन, व्हिज्युअलायझेशन आणि डेटा मॅनेजमेंटसाठी एक सॉफ्टवेअर पॅकेज असते. नवीन किंवा विद्यमान मशिन आणि प्रणालीमध्ये एकत्रीकरण (इंटिग्रेशन) सोपे असते. कंट्रोल कॅबिनेट किंवा फील्ड हाउसिंगमध्ये हे मोड्यूल DIN रेलवर स्थापित केले जाते.
 
पिझोइलेक्ट्रिक स्ट्रेन सेन्सर किंवा अ‍ॅक्सिलरोमीटर, डिव्हाइसच्या संरचनेत किंवा ड्राइव्हवर योग्य ठिकाणी बसविले जातात. मशिन कंट्रोलबरोबर IO कनेक्शनद्वारे जोडले जाते म्हणून कोणताही कंट्रोल असला तरी हे संवेदक वापरण्यात अडचण येत नाही. अ‍ॅक्सेस आणि डेटा व्हिज्युअलायझेशन औद्योगिक पीसी किंवा मशिन कंट्रोल पॅनेलसारख्या एका विंडोज आधारित प्रणालीमधून इथरनेट कनेक्शनद्वारे केले जाते, परंतु सीमेन्स टीसीयू (लिनक्स) कंट्रोलद्वारे थेटदेखील केले जाऊ शकते.
 
फायदे
ARTIS मशिन संरक्षक प्रणाली (GEMCMS02) ओव्हरलोड, टक्कर आणि स्वयंचलित आणि मॅन्युअल ऑपरेशनमध्ये होणारे अपघात विश्वसनीयतेने शोधून काढते. अगदी मंद गतीपासून अगदी वेगवान अक्ष गतीपर्यंत.
प्रतिक्रिया वेग 1 मिलीसेकंदापेक्षा कमी असतो.
मशिन चालू असताना ही प्रणाली सतत चालू असते आणि रेकॉर्डरमध्ये सर्व माहिती गोळा होत असते.
फोर्स सेन्सर मशिनच्या संरचनेमधील (स्ट्रक्चर) पृष्ठभाग विकृती मोजतात. 
 

11_1  H x W: 0  
 
टूल आणि प्रक्रिया संनियंत्रण
ARTIS टूल आणि संनियंत्रण प्रणाली संपूर्ण यंत्रण प्रक्रियेमध्ये टूलच्या परिस्थितीचा मागोवा घेतात. या प्रणाली वैयक्तिकरीत्या समायोज्य (अ‍ॅडजेस्टेबल) सिग्नल मर्यादा प्रदान करून कर्तन कडेची झीज आणि टूल तुटणे इत्यादी गोष्टींचा शोध घेतात.
 
फायदे
टूल, कार्यवस्तू आणि मशिनसाठी यंत्रणादरम्यान कायम संरक्षण
दीर्घ टूल आयुर्मान
भिन्न टूलसाठी पॅरामीटर किंवा स्वयंचलित सेटिंग शक्य आहे.
 
मशिन संनियंत्रण
आजकाल कामादरम्यान स्पिंडलची गती खूप जास्त असते. यंत्रणप्रक्रिया बर्‍याचदा मोठ्या प्रमाणात कंपने निर्माण करते. यामुळे उत्पादनांची गुणवत्ता खराब होते तसेच स्पिंडल आणि अक्षाच्या बेअरिंगचे नुकसान होते.
 
मशिन आणि स्पिंडल कंपने नियंत्रणात ठेवण्यासाठी, परिणामी खर्च कमी करण्यासाठी आणि गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी बेअरिंगमधील नुकसान लवकर शोधणे आवश्यक आहे. सेन्सर सिग्नलचे (कंपन, तापमान आणि गुरुत्वाकर्षण) अचूक मूल्यांकन करून हे साध्य करता येते. अलार्म मर्यादा स्वतंत्रपणे सेट केल्या जाऊ शकतात आणि मापन केलेले मूल्य त्यांच्यापेक्षा वर किंवा खाली गेले, तर लवकरात लवकर निर्धारित प्रतिसाद देता येतो. 
 
ARTIS संनियंत्रण प्रणाली, टूल बदलल्यानंतर आणि यंत्रण प्रक्रियेच्या आधी सुरुवातीच्या टप्प्यावरच मशिनच्या अवस्थेतील अडचणी दर्शविते. टूल बदलत असताना, एखादी चिप हत्यारधारक आणि मुख्य स्पिंडल यांच्या दरम्यानच्या जागेत प्रवेश करू शकते. जर असा प्रसंग उद्भवला, तर बर्‍याचदा यंत्रण करावयाच्या कार्यवस्तुच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. बहुतेक वेळी, चिप आतमध्ये अडकून राहिल्याचा परिणाम संपूर्ण यंत्रणाच्या शेवटीच, जेव्हा कार्यवस्तुची तपासणी केली जाते, तेव्हा लक्षात येतो. अठढखड मशिन संनियंत्रण प्रणालीद्वारा तत्क्षणी शोध म्हणजे त्यानंतरच्या सर्व अनावश्यक कटकटी टाळणे आणि बराच वेळ वाचविणे. 
 
केस स्डडी
भोसरी येथील माधव टूल्स कंपनीमध्ये मिलिंग प्रक्रियेसाठी मारपॉस कंपनीचे टूल प्रोब आणि जॉब प्रोब वापरले जातात. या कंपनीत मुख्यतः कटिंग टूलची कामे केली जातात. कटर बॉडी, पी.सी.डी., ब्रेस कटरची निर्मिती करीत असल्याची माहिती कंपनीचे संचालक जयंत पाटील यांनी दिली. ते म्हणाले, “इन्सर्टच्या पॉकेटिंगसाठी आम्ही मुख्यतः टूल प्रोब आणि जॉब प्रोब वापरतो. 
 
12_1 H x W: 0  
पॉकेटिंग करताना सर्वात प्रथम जॉब प्रोबने कार्यवस्तुचा ऑफसेट घेतो. त्यानंतर कॅड-कॅममधून आउटपुट घेऊन व्ही.एम.सी.वर प्रोग्रॅम चालविला जातो. जॉब प्रोबच्या साहाय्याने कार्यवस्तूवरील काटकोनात असलेल्या पॉकेटमधील, इन्सर्टच्या अँगलप्रमाणे पॉकेट बनले आहे की नाही आणि त्याची खोली आदी गोष्टी यंत्रण प्रक्रिया झाल्यानंतर तपासल्या जातात. टूल प्रोबमध्ये यंत्रण प्रक्रियेपूर्वी टूलचा न अक्ष, व्यास, टूलचा बाह्य व्यास तपासला जातो. मॉरपॉसच्या प्रणालीद्वारे टूलच्या 
 

13_1  H x W: 0  
 
व्यासाची तपासणी एकदम अचूक मोजली जाते. यामध्ये वर्क ऑफसेटदेखील चांगला घेता येतो. त्याशिवाय या उपकरणांची पुनरावर्तनक्षमता (रीपीटॅबिलिटी) अतिशय उत्तम आहे. मागील सहा महिन्यांपासून आम्ही मारपॉस कंपनीचे प्रोब वापरत आहोत. जुन्या पद्धतीत आम्ही वर्क ऑफसेट आणि टूल ऑफसेट हाताने घेत होतो. त्यामुळे आवर्तन काळ जास्त होता. नव्या प्रोबमुळे वर्क ऑफसेट आणि टूल ऑफसेट घेण्यासाठी केवळ दोन मिनिटांचा अवधी लागतो.” 
 
 

shridhar joshi_1 &nb 
श्रीधर जोशी 
9921912025 
 
श्रीधर जोशी यांत्रिकी अभियंते आहेत. मारपॉस इंडिया प्रा. लि.च्या पश्चिम विभागाचे शाखा व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांना 24 वर्षांचा अनुभव आहे.