गिअर ट्रेन हाउसिंगचे मिलिंग

Udyam Prkashan Marathi    31-Jan-2020
Total Views |
 
 
वेद इंडस्ट्रीज या आमच्या कारखान्यामध्ये विविध प्रकारच्या यंत्रभागांवर आम्ही काम करीत असतो. सर्व यंत्रभागांचे कास्टिंग आमच्याच फाउंड्रीमध्ये तयार होते. त्यासाठी सर्व सोयींनी युक्त अद्ययावत सेटअप आमच्याकडे आहे. काही वेळेला अशीही परिस्थिती येत होती की काम वाढल्यामुळे काही यंत्रभागांचे काही अंशी यंत्रण आम्ही बाहेरून करवून घेत होतो. बाहेरून यंत्रण करवून घेतल्यामुळे अनेकदा समस्या निर्माण व्हायच्या. कधी यंत्रभाग वेळेवर मिळत नव्हते तर काही वेळा गुणवत्तेच्या बाबतीतही ग्राहकाकडून तक्रारी वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आम्ही आमच्या कारखान्याची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला. सध्या दाते ग्रुप या मुख्य कंपनीच्या अंतर्गत, वेद इंडस्ट्रीज, राजराजेश्वरी फाउंडर्स आणि ऊर्जा इंडस्ट्रीज अशा 3 कंपन्यांमध्ये आम्ही कामाच्या स्वरूपानुसार विभागणी केली आहे. कामाच्या स्वरूपानुसार विभागणी केल्यामुळे कामात सुसूत्रता तर आलीच त्याशिवाय योग्य ठिकाणी योग्य कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने उत्पादनात चांगले परिणाम दिसून येऊ लागले. 
 

1_1  H x W: 0 x 
 
सध्या वेद इंडस्ट्रीजमध्ये गिअर ट्रेन हाउसिंग या यंत्रभागाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जात आहे. 600 मिमी. लांबी आणि 450 मिमी. रुंदी असलेला हा यंत्रभाग असून त्याला एक ऑइल गॅलरी आहे. या यंत्रभागावर पहिला आणि दुसरा असे दोन्ही सेटअप मिळून दोन्ही बाजूचे अंदाजे 5400 मिमी. एवढे मिलिंग करावयाचे आहे. 
 

2_1  H x W: 0 x 
 
प्रक्रिया 
 
या यंत्रभागाचे कास्टिंग आमच्याच कंपनीत केले आहे. या यंत्रभागामध्ये साधारणतः जझ 10 ला 3.5 मिमी. मटेरियल काढावे (स्टॉक रीमूव्हल) लागते. या यंत्रभागावरील मिलिंग प्रक्रिया आम्ही व्ही.एम.सी. वर 2 पॅलेट वापरून करतो. 
 
समस्या 1
 
सुरुवातीला या यंत्रणामध्ये आम्हाला अपेक्षित सपाटपणा (फ्लॅटनेस) मिळत नव्हता. यंत्रभागाचे क्लॅम्पिंग करताना समस्या येत होती. क्लॅम्पिंगचा दाब जास्त असल्याचे लक्षात आल्यावर तो कमी करून सपाटपणा (फ्लॅटनेस) मिळेल अशी खात्री करून घेतली. यामुळे यंत्रभाग वाकण्याची समस्या दूर झाली. 
 

3_1  H x W: 0 x 
 
समस्या 2 
 
सुरुवातीला प्रक्रिया ठरविताना आम्ही केनामेटलचा 80 मिमी. व्यासाचा कटर घेतला. त्यात आम्ही कार्बाइडचे इन्सर्ट वापरीत होतो. या कटरमध्ये 7 इन्सर्ट बसतात. त्याची किंमत 750 रुपये/इन्सर्ट होती. या यंत्रभागामध्ये एकूण यंत्रणाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे 4 ते 5 यंत्रभागांचे यंत्रण झाले की काही वेळेला इन्सर्ट तुटत होते, तर काहीवेळा चिप ऑफ होत होते. इन्सर्टसाठी मोजलेली किंमत आणि प्रति यंत्रभाग येणारा खर्च (CPC) यांचा कुठेच ताळमेळ लागत नव्हता. टूलिंगचा खर्च जास्त येत होता.
प्रति महिना 2000 यंत्रभागांचे उत्पादन करणे हे आमचे उद्दिष्ट आम्ही ठरविले होते. परंतु ते आम्हाला साध्यच करता येत नव्हते. प्रति दिवस 30 म्हणजे जवळपास 900 यंत्रभाग प्रति महिना असा आकडा आम्ही गाठू शकलो होतो. आमच्याकडील एच.एम.सी.ची क्षमता भरपूर होती. परंतु 2000 हा आकडा आम्हाला साध्य करता येत नव्हता. 
 
सध्या दाते ग्रुप या मुख्य कंपनीच्या अंतर्गत, वेद इंडस्ट्रीज, राजराजेश्वरी फाउंडर्स आणि ऊर्जा इंडस्ट्रीज अशा 3 कंपन्यांमध्ये आम्ही कामाच्या स्वरूपानुसार विभागणी केली आहे. कामाच्या स्वरूपानुसार विभागणी केल्यामुळे कामात सुसूत्रता तर आलीच त्याशिवाय योग्य ठिकाणी योग्य कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने उत्पादनात चांगले परिणाम दिसून येऊ लागले.
 
दोन्ही बाजूच्या रफिंगसाठी 10 मिनिटांचा वेळ लागत होता. ठराविक मर्यादेबाहेर एखादा यंत्रभाग जास्तीचा केला तर इन्सर्ट लगेच तुटत होता. इन्सर्ट तुटल्यामुळे यंत्रभागाचा पृष्ठभाग खराब होऊन यंत्रभाग नाकारला जायचा. याच स्थितीत थोडेफार दिवस आम्ही घालविले. परंतु इन्सर्टवर काहीतरी पर्याय शोधला पाहिजे यावर आमचे एकमत झाले.
 

4_1  H x W: 0 x 
 
उपाय 
 
आम्ही टूल उत्पादकाला आमची समस्या सांगून अपेक्षित असलेला आवर्तन काळदेखील त्यांना (सायकल टाइम) सांगितला. संशोधनानंतर सिरॅमिक इन्सर्ट हा चांगला पर्याय आमच्यासमोर उपलब्ध झाला. त्यासाठी आम्ही सिरॅमिक ही संकल्पना काय आहे हे लक्षात घेतले. त्यासाठी काय पद्धत वापरायची, वेट की ड्राय मिलिंग करायचे, त्याची किंमत किती असणार, उझउ किती असेल, याबाबत काहीच अंदाज नव्हता. सिरॅमिक इन्सर्ट टफ ग्रेडचे असतात. त्याचा यंत्रणवेग (VC) 700 मी./मिनिटपेक्षा अधिक असतो. अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही टूल उत्पादकाकडून त्याबाबतचे प्रपोजल घेतले. त्यानंतर आम्ही त्यांना चाचणी घेण्यासाठी बोलविले. चाचणीदरम्यान त्यांनी 3500 आर.पी.एम. आणि 3200 फीड लावण्यास सांगितले. त्यावेळी आम्ही आश्चर्य व्यक्त केले, कारण आमचा चालू वेग 1116 आर.पी.एम होता. यंत्रभाग उडतोय की कटर उडतोय अशी आम्हाला त्यावेळी भीती वाटली. परंतु 100 Nm दाबाचे फिक्श्चर लावून यंत्रभागाचे यंत्रण अतिशय सफाईदार आणि सुलभपणे झाले. दीड मिनिटांत मिलिंग पूर्ण झाले. यामध्ये जवळपास 8.5 मिनिटे वाचली.
 

chart_1  H x W: 
 
फायदे
 
>  कोरडे यंत्रण होत असल्याने शीतकाचा खर्च वाचला, कारण यंत्रण झाल्यानंतरच फक्त कटर आणि कार्यवस्तू थंड करण्यासाठी शीतक सोडले जाते.
फिनिशिंगसाठी जुनाच कार्बाइड इन्सर्ट अजूनही वापरला जातो. पहिल्या पद्धतीमध्ये कार्बाइड इन्सर्ट आधी रफिंगसाठी वापरला जायचा आणि त्यानंतर फिनिशिंगसाठी वापरत होतो. नवीन पद्धतीमध्ये फिनिशिंगसाठी कार्बाइड इन्सर्ट आणि रफिंगसाठी सिरॅमिक इन्सर्ट वापरत आहोत. त्यामुळे इन्सर्टचे आयुष्य वाढले आहे. 
नवीन पद्धतीमध्ये अपेक्षित फिनिश मिळू लागला. पुढील काही दिवसांत CBN ची चाचणी होईल. त्यात यश मिळाल्यास वेळेत आणखी बचत होईल असा आम्हाला विश्वास आहे.
 
 
 

mahesh date_1   
महेश दाते 
9822091106
 
महेश दाते यांत्रिकी अभियंता असून, ‘दाते ग्रुप’चे ते संचालक आहेत. इचलकरंजीमधील विविध औद्योगिक संस्थांच्या पदावरदेखील ते कार्यरत आहेत. फाउंड्री आणि यंत्रण क्षेत्रातील त्यांना 18 वर्षांचा अनुभव आहे.