जाहिरात संबंधित

Udyam Prkashan Marathi    08-Jan-2020
जून 2017 मध्ये स्थापना झाल्यापासून यांत्रिकी अभियांत्रिकीमधील (मेकॅनिकल इंजिंनिअरिंग) उत्पादन क्षेत्राला समर्पित ‘धातुकाम’ या मराठी मासिकाचे 30 हून अधिक अंक, तर नोव्हेंबर 2018 मध्ये सुरुवात झालेल्या हिंदी मासिक ‘धातुकार्य’ आणि कन्नड मासिक ‘लोहकार्य’ चे 12 हून अधिक अंक प्रकाशित झाले आहेत. या मासिकाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. 40,000 हून अधिक लघु, मध्यम आणि मोठ्या कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक संस्थांपर्यंत हे मासिक पोहोचत आहे. भारतामध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्कृती निर्माण होण्यात मदत व्हावी, या उद्देशाने हे आभियांत्रिकीविषयक मासिक भारतीय भाषांमध्ये सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रकाशित केले जात आहे. आम्ही त्या दिशेने चांगली प्रगती करीत आहोत.
 
आपल्या उत्पादनांच्या वैशिष्ट्यांविषयी त्याच्या वापरकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची आपणास ही एक उत्तम संधी आहे. आपल्या जाहिराती 40,000 हून अधिक कंपन्यांपर्यंत पोहोचतील, एवढेच नाही तर त्यांचे वाचन आमच्या मासिकातील लेखांच्या नियमित वाचनामुळे तांत्रिकदृष्ट्या माहितगार झालेल्या वाचकवर्गाद्वारे केले जाईल.
 
वाचकांना संबंधित उत्पादनांची माहिती देऊन मासिकाचे मूल्यवर्धन करण्याबरोबर मासिक सुरळीतपणे चालविण्यासदेखील जाहिराती मदत करतात, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. 3/6/12 महिन्यांच्या कालावधीसाठी जाहिराती देऊन आमच्या नाविन्यपूर्ण आणि अनोख्या उपक्रमाला मदत करण्याचे आवाहन आम्ही तुम्हा सर्वांना करीत आहोत. 
 
वेळापत्रक आणि जाहिरातींच्या दरांच्या माहितीसाठी पुढे दिलेल्या क्रमांकावर आमच्या प्रतिनिधींशी अवश्य संपर्क साधा.
 
मो. नं.- +९१ ९३०३९०९७४७
ईमेल:  [email protected] 
 
आमच्या मासिकामध्ये जाहिराती देऊन आपण भारतीय उत्पादन उद्योगाच्या अगदी तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत हे ज्ञान आणि माहिती पोहोचविण्याच्या आमच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा, अशी आपणा सर्वांना आमची नम्र विनंती आहे.