स्‍केलिंग फंक्‍शन

Udyam Prakashan Marathi    21-Feb-2020
Total Views |
 
सर्वसामान्यपणे सी.एन.सी. मशिनिंग सेंटरवर प्रोग्रॅमप्रमाणे होणारी टूलची हालचाल ड्रॉइंगमधील मापांप्रमाणे असते. काही वेळेला कटरच्या त्रिज्येचा ऑफसेट त्यात मिळविलेला असतो. बर्‍याचवेळा मशिनिंग सेंटरवर काम करत असताना प्रोग्रॅमप्रमाणे चालणार्‍या टूलची हालचाल परत परत त्याच मार्गाने करण्याची गरज निर्माण होते. टूलची ही हालचाल प्रोग्रॅममध्ये दिलेल्या मूल्यापेक्षा जास्त किंवा कमी करण्याची गरज भासते. तसेच ही हालचाल मूळ हालचालीच्या गुणोत्तरात असावी लागते. हे साध्य करण्यासाठी नियंत्रकामध्ये (कंट्रोलर) एक विशिष्ट सोय उपलब्ध करून दिलेली असते. त्यास स्केलिंग फंक्शन असे म्हटले जाते.
 
स्केलिंग फंक्शनसंबंधी महत्त्वाचे मुद्दे
1. स्केलिंग फंक्शन बर्‍याच नियंत्रकांमध्ये वैकल्पिक असते. त्यामुळे प्रत्येक मशिनवर ते असेलच असे नाही.
2. काही नियंत्रकांमध्ये सिस्टिम पॅरामीटर वापरून ते कार्यान्वित करता येतात.
3. प्रोग्रॅमिंगमध्ये लवचीकता आणण्यासाठी स्केलिंग फंक्शन इतर प्रोग्रॅमिंग फंक्शनबरोबर वापरता येते. उदाहरणार्थ, डेटम शिफ्ट मिरर इमेज, कोऑर्डिनेट सिस्टिम रोटेशन
 
वर्णन
 
सर्व प्रोग्रॅम केलेल्या हालचालींना, नियंत्रकामार्फत एक ठराविक स्केलिंग फॅक्टर लावला जातो. यामुळे सर्व अक्षाचे प्रोग्रॅम केलेले मूल्य बदलले जाते.
स्केलिंग प्रोसेससाठी अपेक्षित मूल्य = प्रोग्रॅम केलेले अक्षाचे मूल्य X स्केलिंग फॅक्टर
स्केलिंग फॅक्टर स्केलिंग सेंटर पॉइंटवर आधारित असतो. त्यासाठी प्रोग्रॅमरला स्केलिंग सेंटर पॉइंट आणि स्केलिंग फॅक्टर या दोन्ही गोष्टी सांगाव्या लागतात. नियंत्रकातून पॅरामीटरमार्फत स्केलिंग चालू/बंद करता येते. स्केलिंग मुख्य तीन अक्षांना (X,Y,Z) स्वतंत्रपणे चालू/बंद करता येते. व्यवहारात बहुतेकवेळा स्केलिंग फक्त X आणि Y अक्षालाच वापरले जाते. स्केलिंग फंक्शनच्या वापरामुळे पुढील ऑफसेट फंक्शनमध्ये कोणताही बदल होत नाही.
कटर त्रिज्या ऑफसेट G41 - G42/D
टूल लेंग्थ ऑफसेट G43 - G44/H
टूल पोझिशन ऑफसेट G45 - G48/H
तसेच नियमित (फिक्स्ड्) आवर्तनामध्ये पुढील ठिकाणी स्केलिंग फंक्शन वापरल्याचा परिणाम होत नाही.
 
• G76 आणि G87 आवर्तनामधील X, Y शिफ्ट मूल्य
• G83 आणि G73 आवर्तनामधील पेक ड्रिल खोली Q
• G83 आणि G73 आवर्तनामध्ये स्टोअर केलेले रिलीफ मूल्य
 
स्केलिंग फंक्शनचा वापर
 
स्केलिंग फंक्शनच्या वापरामुळे अतिरिक्त कामासाठीचे वाया जाणारे तास वाचतात. त्यामुळे खालील ठिकाणी स्केलिंग फंक्शनचा वापर फायदेशीर ठरतो.
 
•भौमितिक साम्य असलेले भाग
•अंतर्भूत श्रिंकेज फॅक्टर असणार्‍या भागाचे यंत्रण
•मोल्डिंग काम
•आट्यांच्या यंत्रणामध्ये इंग्लिश ते मेट्रिक, तसेच मेट्रिक ते इंग्लिश प्रकारच्या आट्यांमध्ये रूपांतर
•कोरलेल्या (एन्ग्रेव्ह) केलेल्या अक्षरांचे आकार बदलणे
(चित्र क्र. 1), त्याचप्रमाणे मूळ आकारापेक्षा आकार वाढविणे आणि आकार कमी करणे यासाठी स्केलिंगचा वापर केला जातो. मूळ आकार म्हणजे सध्या अस्तित्वात असलेला टूल मार्ग.
 

1_1  H x W: 0 x 
 
प्रोग्रॅमिंग फॉरमॅट 
 
सी.एन.सी. प्रोग्रॅमरला पुढील माहिती नियंत्रकाला द्यावी लागते.
•स्केलिंग सेंटर : संदर्भ बिंदू (पिव्हट पॉइंट)
•स्केलिंग फॅक्टर : कमी करणे किंवा वाढविणे
स्केलिंगसाठी पुढील दोन G कमांड वापरल्या जातात.
 

2_1  H x W: 0 x 
 
प्रोग्रॅमिंग फॉरमॅट 
G51 I..J..K..P
 

3_1  H x W: 0 x 
 
स्केलिंग फंक्शन वापरासंबंधी महत्त्वाच्या सूचना
•G51 कायम स्वतंत्र ब्लॉकमध्ये प्रोग्रॅम करावा.
•मशिन झीरोसंबंधाने असलेल्या कमांडचे (G27, G28, G29, G30) प्रोग्रॅमिंग स्केलिंग बंद असताना करावे.
•G92 पोझिशन रजिस्टर कमांडसुद्धा स्केलिंग फंक्शन बंद असताना करावी.
•कटरची त्रिज्या ऑफसेट G41/G42 प्रथम G40 ने रद्द कराव्यात आणि मगच स्केलिंग फंक्शन वापरावे. 
स्केलिंग सेंटर (मूळ टूलपाथ निरनिराळ्या प्रकारांनी स्केलिंग सेंटर)
 

4_1  H x W: 0 x 
 
स्केल केलेल्या टूलमार्गाचे स्थान स्केलिंग सेंटरने ठरविले जाते. 
स्केल केलेल्या भागावर स्केलिंग सेंटरचा परिणाम
 

5_1  H x W: 0 x 
 
B : टूल मार्ग
A : वाढीव टूल मार्ग
C : स्केलिंग सेंटर
A1 - A8 : मार्ग 2
B1 - B8 : मार्ग 1
 
जर A1 - A8 मूळ मार्ग पकडला तर B1 - B8 स्केल केलेला टूल मार्ग होईल.
सेंटर C आणि स्केलिंग फॅक्टर एकपेक्षा कमी.
जर B1 - B8 मूळ मार्ग पकडला तर A1 - A8 स्केल केलेला टूल मार्ग होईल.
स्केलिंग फॅक्टर एकपेक्षा जास्त : वाढ
स्केलिंग फॅक्टर एकपेक्षा कमी : कमी
स्केलिंग फॅक्टर = 1 : बदल नाही, आहे तसे.
 
प्रोग्रॅम उदाहरण
 

6_1  H x W: 0 x 
 
01201 (प्रोग्रॅम G54 वापरून - स्केलिंग नाही.)
N1 G20
N2 G17 G40 G80
N3 G90 G00 G54 X -1.25 Y - 1.25
S800 M03
N4 G43 Z 1.0 H01 M08
N5 G01 Z-0.7 F50.0
N6 G41 X -0.75 D01 F25.0
N7 Y1.75 F15.0
N8 X 1.5
N9 G02 X 2.5 Y0.75 I0J-1.0
N10 G01 Y-0.75
N11 X-1.25
N12 G40 Y-1.25 M09
N13 G00 Z1.0
N14 G28 Z 1.0
N15 G28 X-1.25 Y-1.25
N16 M30
%
 
प्रोग्रॅम 01202 : स्‍केलिंग फॅक्‍टर 
1.05 (5%) वाढ 
स्‍केलिंग सेंटर X0 Y0 Z0
N1 G20
N2 G17 G40 G80
N3 G50 (स्‍केलिंग बंद)
N4 G90 G00 G54 X -1.25 Y-1.25
S800 M03
N5 G43 Z1.0 H01 M08
N6 G51 I0 J0 K0 P1.050 (X0 Y0 Z0 पासून स्‍केलिंग सुरू)
N7 G01 Z-0.7 F50.0
N8 G41 X-0.75 D01 F25.0
N9 Y1.75 F15.0
N10 X 1.5
N11 G02 X2.5 Y0.75 I0 J-1.0
N12 G01 Y-0.75
N13 X -1.25
N14 G40 Y -1.25 M09
N15 G50 (स्‍केलिंग बंद)
N16 G00 Z1.0
N17 G28 Z1.0
N18 G28 X -1.25 Y -1.25
N19 M30
%
 
 
 

satish joshi_1   
सतीश जोशी
लेखक आणि सल्लागार
8625975219
 
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.