अक्षाच्या मशिन झीरो स्थानासाठी प्रोग्रॅम

Udyam Prakashan Marathi    29-Mar-2020
Total Views |
 
प्रत्येक सी.एन.सी. मशिनमध्ये अक्ष, मशिन झीरो स्थानावर जाणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे अक्ष मशिन झीरो स्थानावर नेण्यासाठी मॅन्युअली नियंत्रकावरील (कंट्रोलर) बटण दाबून नेता येतो. नव्याने प्रगत झालेल्या नियंत्रकामध्ये अक्ष रेफरन्स स्थानावर नेण्यासाठी काही ठराविक G कमांड निर्धारित केल्या आहेत. या लेखामध्ये सदर कमांडचा अर्थ, क्रिया आणि उदाहरण देऊन त्याविषयी माहिती दिली आहे. 
 
प्रोग्रॅम G27, G28, G29, G30
G27 मशिन झीरो रेफरन्स पोझिशन रिटर्न चेक
G28 रिटर्न टू प्रायमरी मशिन झीरो रेफरन्स पोझिशन
G29 रिटर्न फ्रॉम मशिन झीरो रेफरन्स पोझिशन
G30 रिटर्न टू सेकंडरी मशिन झीरो रेफरन्स पोझिशन
 
वरील चार कमांड मशिन झीरो रेफरन्स पोझिशन संबंधात वापरल्या जातात. G28 जास्तीतजास्त दोन आणि तीन अक्षाच्या सी.एन.सी. प्रोग्रॅमिंगमध्ये वापरली जाते. याचा मुख्य हेतू काम चालू असलेले टूल, मशिन झीरो स्थानावर आणणे आणि G28 मध्ये सांगितल्याप्रमाणे एक किंवा दोन अक्षावर ते झीरो रेफरन्स करणे होय. 
 
G27 ते G30 या सर्व कमांड फानुक ग्रुपने डिझाइन केलेल्या ग्रुप 00 मध्ये येतात.
या कमांड नॉन मोडल किंवा वन शॉट G कोड या ग्रुपमध्ये येतात.
या कोडच्या वापरासाठी एक महत्त्वाची सूचना : या ग्रुपमधील प्रत्येक G कोड वापरीत असताना, वापरीत असलेल्या प्रत्येक ब्लॉकमध्ये ती कमांड येणे आवश्यक आहे. समजा G28 ही कमांड Z अक्षासाठी एका ब्लॉकमध्ये वापरली आहे आणि त्यानंतर पुढील ब्लॉकमध्ये X आणि Y साठी वापरायची असेल तर ती परत प्रत्येक ब्लॉकमध्ये द्यावी लागते.
 
उदाहरणार्थ 
N10 G28 Z (मशिन झीरो रिटर्न Z अक्ष)
N20 G28 X,Y (मशिन झीरो रिटर्न X,Y अक्ष)
N20 ब्लॉकमधील G28 जर गाळली किंवा विसरली, तर मागच्या मोशन कमांडप्रमाणे हालचाल होईल. (G00 किंवा G01)
• G28 कमांड देताना कमीतकमी एक अक्ष देणे आवश्यक आहे.
N10 G28..अर्थहीन कमांड
N20 G28 X..अर्थपूर्ण कमांड केवळ X अक्ष
G30 G28 Y..अर्थपूर्ण कमांड केवळ Y अक्ष
G40 G28 Z... अर्थपूर्ण कमांड केवळ Z अक्ष
N50 G28 XYZ सर्व अक्ष मशिन झीरो रेफरन्स पोझिशनला जातील.
• फानुक डिझाइन आणि व्याख्येप्रमाणे G28 ते G30 यामध्ये एका मध्यवर्ती पॉइंटला मशिन झीरोकडे जात असताना ठराविक गती असते. 
G28 आणि G30 बरोबर असणाऱ्या कोऑर्डिनेट व्हॅल्यू मध्यवर्ती बिंदू दर्शवितात.
• G90 ॲब्सोल्युट आणि G91 इन्क्रिमेंटल यांचा बराच फरक G28 किंवा G30 प्रक्रियेवर पडतो.
G28 कमांडमुळे टूल मशिन झीरोकडे जात असताना एका मध्यवर्ती पॉइंटमधून जाते.
 
प्रोग्रॅम G90
 

1_1  H x W: 0 x 
 
• G00 X6.0 Y6.0 मशिन होल
• (या पोझिशनला भोक पाडायचे आहे.) (चित्र क्र. 1)
• G28 X6.0 Y6.0 मशिन झीरो रिटर्न
• वरील प्रोग्रॅम सुरक्षित जागेवरील मध्यवर्ती पॉइंटला धरून
 
G90
G00 X6.0 Y6.0 (मशिन होल)
G28 X14.0 Y6.0 (मशिन झीरो मोशन)
 
वरील प्रोग्रॅमपेक्षा सुरक्षित प्रोग्रॅम पुढीलप्रमाणे करता येईल.
G90
G00 X6.0 Y6.0 (मशिन होल)
X14.0 (सुरक्षित जागा)
G28 X14 Y6.0 (मशिन झीरो रिटर्न)
प्रोग्रॅम फॉरमॅट G91 G28 X (U)... Z (W)... इन्क्रिमेंटल
X...Z...G90 साठी मध्यवर्ती पोझिशन ॲब्सोल्युट
U...W...G90/G91 साठी मध्यवर्ती पोझिशन
ॲब्सोल्युट/ इन्क्रिमेंटल
 
प्रोगॅम G28
 

2_1  H x W: 0 x 
 
G90 G00 X14.4 Y9.0 (करंट पॉइंट XY ) (चित्र क्र. 2)
Z2.0 (करंट पॉइंट Z)
G01 Z-13.3 F150.0
G28 X14.4 Y9.0 Z2.0 (इंटरमीडिएट पॉइंट)
वरील उदाहरण रिट्रॅक्ट मोडसह
रिट्रॅक्ट मोडसह प्रोग्रॅम (चित्र क्र. 3)
 

3_1  H x W: 0 x 
 
G90 G00 X14.4 Y9.0 
Z2.0
G01 Z-13.3 F150
G00 Z2.0 (सुरक्षित रिट्रॅक्ट)
G28 X14.4 Y9.0 Z2.0 (इंटरमीडिएट पॉइंट)
तोच प्रोग्रॅम इन्क्रिमेंटल झीरो रिटर्नमध्ये (चित्र क्र. 4 आणि 5)
 

4 5_2  H x W: 0 
 

4 5_1  H x W: 0 
 
G90 G00 X14.4 Y9.0
Z2.0
G01 Z-13.3 F150.0
G00 Z2.0 (सुरक्षित रिट्रॅक्ट)
G91 G28 X0 Y0 Z0 (इंटरमीडिएट पॉइंट)
G90 (ॲब्सोल्युट मोड पुन्हा आणणे)
 
G29 रिटर्न फ्रॉम मशिन झीरो
• व्हर्च्युअल ऑपोझिट G28
या कमांडमुळे टूल मागच्या इंटरमीडिएट पॉइंटपासून करंट टूल पोझिशनद्वारे मशिन झीरोला जाईल.
 
प्रोग्रॅम फॉरमॅट
 
G29 X(U)...Z(W)...
X...Z...G90 साठी टार्गेट पॉइंट ॲब्सोल्युट
U...W...G90/G91 टार्गेट पॉइंट इन्क्रिमेंटल
टूल नंबर एक चालू (वर्किंग)
G90 G00 X50.0 Y30.0 
Z2.0
G01 Z-15.0 F150.0 टूल कार्यवस्तुच्या खाली ImbrG28 X50 Y30.0 Z2.0 XY करंट पोझिशनद्वारे Z2.0 प्रथम
M06 टूल क्रमांक दोन चालू
...
G90 G29 X75.0 Y40.0 Z2.0
कोऑर्डिनेट नवीन टार्गेट ठिकाण दर्शवितात.
प्रत्यक्ष मशिनवर काय घडेल ते पहा.
1. पहिल्या टूलने Z-15.0 या खोलीवर X50 Y30 यंत्रण होईल.
2. टूल क्रमांक 1 Z2.0 इतक्या अंतराने रिट्रॅक्ट होईल. या पोझिशनवरून तीनही अक्ष मशिन झीरोला परत जातील.
3. टूल क्रमांक 2 काम करेल. G29 टार्गेट ठिकाण दर्शविते. X75.0 Y40.0 आणि Z2.0
4. कंट्रोल गेल्या वेळचा इंटरमीडिएट बिंदू (X50 Y30 Z2.0) वापरून टूल प्रथम पोझिशनला घेतले जाते.
5. त्यानंतर प्रत्यक्ष टार्गेटला X75.0 Y40.0 Z2.0 जाईल.
 
महत्त्वाची सूचना : सर्वसाधारणपणे G29 ही कमांड प्रोग्रॅममध्ये वापरण्याचे टाळले जाते. कारण G29 ही व्हर्च्युअल ऑपोझिट G28 आहे.
 
G27 मशिन झीरो रिटर्न पोझिशन चेक
• सध्याच्या प्रगत प्रोग्रॅमिंगमध्ये या कमांडचा प्रत्यक्ष काहीही उपयोग नाही.
• जुन्या कंट्रोलमध्ये G92 किंवा G50 पोझिशन रजिस्टर जिथे वापरावी लागतात अशावेळी G27 उपयोगी पडते. थोडक्यात ज्या प्रणालीमध्ये वर्क ऑफसेटची सोय नसते, अशा ठिकाणी ही कमांड उपयोगी पडू शकते.
• G92 रजिस्टरमध्ये X, Y, Z कोऑर्डिनेट भाग झीरोपासून करंट टूल पोझिशनपर्यंतचे स्टोअर केलेले असतात.
• महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे कोऑर्डिनेट मशिन झीरोपासून नसतात.
 
प्रोग्रॅम फॉरमॅट G27 X(U)...Z(W)...
X...Z... ॲब्सोल्युट कमांडमध्ये रेफरन्स पोझिशन (G90)
इन्क्रिमेंटल कमांडमध्ये रेफरन्स पोझिशन (G91)
U...W...G90/G91 रेफरन्स पोझिशन इन्क्रिमेंटल कमांड
G27 वापरून प्रोग्रॅम : G90 ॲब्सोल्युट मोड (चित्र क्र. 6)
 

6_1  H x W: 0 x 
 
G92 X300 Y200 Z100.0 मशिन झीरो करंट टूल लोकेशन
G00 X20 Y15 Z2.0 सुरुवात बिंदू कटिंगसाठी
G01 Z-5.0 F12.0 मशिन ॲब्सोल्युट खोली 5 मिमी.
G91 G01 X 40 F150.0 मशिन पार्ट इन्क्रिमेंटल कमांड 
मोडमध्ये कट 1/4
Y30.0 मशिन पार्ट इन्क्रिमेंटल कमांड मोडमध्ये कट 2/4
X-40.0 मशिन पार्ट इन्क्रिमेंटल कमांड मोडमध्ये कट 3/4
Y-30.0 मशिन पार्ट इन्क्रिमेंटल कमांड मोडमध्ये कट 4/4
G00 Z7 रिट्रॅक्ट 7 मिमी.
G27 X280.0 Y145.0 Z96.0 मशिन झीरोला मोशन थांबते.
वरील प्रोग्रॅममध्ये G27 ब्लॉक पहा.
 
यंत्रण पूर्ण झाल्यानंतर सर्व अक्ष G27 मध्ये सांगितलेल्या बिंदूला जाऊन थांबतात. हा बिंदू मशिन झीरोच्या संदर्भात इन्क्रिमेंटल कमांड मोडमध्ये असतो. यातील प्रश्न असा आहे की, सर्व अक्ष प्रत्यक्ष मशिन झीरोला गेले आहेत का?
 
तर ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर G27 तपासणी करतो आणि जर अक्ष मशिन झीरो बिंदूला पोहोचला असेल तर अक्षाची खात्री करणारे दिवे चालू होतील. जर अक्ष मशिन झीरो स्थानावर पोहोचला नाही तर कंट्रोल अलार्म देईल आणि पुढची प्रक्रिया थांबवेल.
 
G27 समजण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे संपूर्ण प्रोग्रॅम ॲब्सोल्युट मोडमध्ये रूपांतरित करा.
 
G90 ॲब्सोल्युट मोड
G92 X300.0 Y200.0 Z100.0
चालू टूल लोकेशन मशिन झीरो
G00 X20.0 Y15.0 Z2.0 कटिंगसाठी सुरुवात
 
G01 Z-5.0 F120.0 ॲब्सोल्युट खोली 5 मिमी.वर मशिन
G01 X60.0 F150.0 मशिन पार्ट ॲब्सोल्युट मोड कट 1/4
Y 45.0 मशिन पार्ट ॲब्सोल्युट मोड कट 2/4
Y20.0 मशिन पार्ट ॲब्सोल्युट मोड कट 3/4
Y15.0 मशिन पार्ट ॲब्सोल्युट मोड कट 4/4
G00 X2.0 रिट्रॅक्ट 2 मिमी. वर
G27 X280.0 Y185.0 Z98.0 मशिन झीरोवर मोशन थांबते का? ते तपासा.
शेवटच्या दोन X, Y, Z पोझिशन लिहा. (G27 च्या वरील)
ते पुढीलप्रमाणे आहेत. X20.0 Y15.0 Z2.0
त्यानंतर G92 मधील अक्षानुसार मूल्य वजा करा.
 

7_1  H x W: 0 x 
 
G27 वापरासाठी सूचना
• G27, G40 मोडमध्येच वापरावे. (कटर त्रिज्या)
• मशिन लॉक असताना G27 चालत नाही. ऑफसेट कॅन्सल
• G91 इन्क्रिमेंटल कमांड मोड प्रोग्रॅमिंग जास्त फायदेशीर ठरते.
• सर्वसाधारण वापरामध्ये मशिन झीरोला परत येेण्यासाठी G28 चा वापर करावा. यामध्ये पोझिशन तपासणी अंतर्भूत (बिल्ट इन) असते.
• मिलिंग आणि टर्निंगमध्ये याचा वापर करता येतो.
 
G30 सेकंडरी मशिन झीरो रिटर्न
बहुतेक व्हर्टिकल मशिनमध्ये फक्त एक मशिन झीरो असतो. एक मशिन झीरो म्हणजे प्रायमरी मशिन झीरो होय. पॅलेट चेंजर असणाऱ्या हॉरिझाँटल मशिनिंग सेंटरसाठी आणखी एका सेकंडरी मशिन झीरो लोकेशनची जरूर लागते. याचा उपयोग दोन स्वतंत्र पॅलेट अलाइन करण्यासाठी होतो. G28 आणि G30 चे काम सारखेच आहे.
G28 रिटर्न टू प्रायमरी मशिन झीरो
G29 रिटर्न टू सेकंडरी मशिन झीरो
 

satish joshi_1   
सतीश जोशी
लेखक आणि सल्लागार
0 8625975219
  
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.