ड्रिलिंग प्रोग्रॅम

Udyam Prakashan Marathi    07-Apr-2020
Total Views |
 
ड्रिलिंग कामामध्ये टूलच्या फिरणाऱ्या कडांचा वापर हव्या असणाऱ्या व्यासाचे आणि खोलीचे दंडगोलाकार भोक करण्यासाठी केला जातो. ड्रिलिंग प्रक्रिया अतिशय सोपी आणि सरळ असते. ड्रिलिंगसंदर्भातील इतर काही कामे रीमिंग, टॅपिंग, काउंटर बोरिंग, काउंटर सिंकिंग, सेंटर ड्रिलिंग, स्पॉट फेसिंग अशी असतात. G81 ड्रिलिंग सायकल, G82 ड्रिलिंग सायकल, G83 पेक ड्रिलिंग सायकल, G72.1 रोटेशनल कॉपी, G72.2 लिनीअर कॉपी यासारखे G फंक्शनमध्ये उपलब्ध असलेले प्रोग्रॅम वापरून अचूकपणे, कमी वेळात क्लिष्ट ड्रिलिंग कामसुद्धा सहज करता येते. वर उल्लेख केलेले G फंक्शन फानुक सी.एन.सी. कंट्रोलसंदर्भात आहेत. इतर कंट्रोलबाबत त्यांच्या कॅटलॉगवरून माहिती घेता येते. 
 
सर्वसाधारणपणे ड्रिलिंग करीत असताना शीतकाचा वापर केला जातो, ज्यामुळे टूलचे आयुर्मान वाढण्यास मदत होते. 
 
प्रोग्रॅमिंग उदाहरण 1
 
गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट असणाऱ्या कार्यवस्तूचे यंत्रण फानुक कंट्रोलमधील दोन खास फंक्शन वापरून सहज करता येते. चित्र क्र. 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे एकूण 16 ड्रिल निरनिराळ्या ठिकाणी करावयाची आहेत. सर्वसाधारणपणे अशा कार्यवस्तुंना जास्त वेळ लागण्याची शक्यता असते. G72.1 रोटेशनल कॉपी आणि G72.2 लिनीअर कॉपी या खास G फंक्शनचा वापर करून प्रोग्रॅम बनविला आहे. टूलचे सुरुवातीचे स्थान (पोझिशन) निश्चित करून घेतले आहे आणि ते X17, Y175, Z100 असे आहे. G72.2 साठी सबप्रोग्रॅम बनविला आहे.
 

1_1  H x W: 0 x 
 

chart_1  H x W: 
 
त्याचा वापर करून कार्यवस्तू अचूक पद्धतीने कमीतकमी वेळात आणि इष्टतम (ऑप्टिमम) लांबी ठेवून प्रोग्रॅम केला आहे. 
रोटेशनल कॉपी (G72.1) लिनीअर कॉपी (G72.2) 
 
उदाहरण 2 
 
G98, G99 चा वापर करून प्रोग्रॅम बनविला आहे. (चित्र क्र. 2)
 
 

2 2_2  H x W: 0 
 

2 2_1  H x W: 0 
 
 

satish_1  H x W 
सतीश जोशी
8625975219
 
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.