धातुकाम

तिरक्या छिद्रांचे अचूक यंत्रण

सरळ रेषेतील रेसिप्रोकेटिंग चलन वर्तुळाकारात रूपांतरित करणारा क्रँकशाफ्ट, इंजिनमधील एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे वाहनाला गती मिळते. क्रँकशाफ्टची निर्मिती करणे तसे क्लिष्ट काम आहे, परंतु, वाहनउद्योगात याची मोठ्या प्रमाणात गरज असते. त्यामुळे क्रँकशाफ्टचे उत्पादन वाढविण्यासाठी बाजारात जे काही नवीन तंत्रज्ञान येते त्याचे सर्वांकडून स्वागतच केले जाते..

स्मार्ट टूल डिस्पेन्सर

आमच्या कारखान्यात इन्सर्टचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या इन्सर्टचे व्यवस्थापन करणे, इन्सर्टच्या वापरावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यकही होते. आमचे स्टोअर फक्त एकाच शिफ्टसाठी चालत असल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टसाठी इन्सर्टचे वितरण अंदाजे होत असे...

अचूक सेटिंगसाठी NT टूल करेक्शन सिस्टिम

ड्रिल/कास्ट/कोअरने केलेली भोके मोठी करण्यासाठी, एकच बिंदू असलेल्या टूलद्वारे धातू काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणजे बोरिंग प्रक्रिया होय. यामध्ये भोके आधी थोड्या कमी आकारात ड्रिल/कास्ट केली जातात, ..

ड्रिलमधील नवीन भूमिती

यत्रण उद्योगामध्ये ड्रिलिंग हा सर्वात जास्त वापरला जाणारा यंत्रण प्रकार आहे. एका वाहनात साधारणपणे 5000 भोकसदृश आकार असतात. ही सर्व भोके ड्रिलिंगने केली जात नसली तरी त्यापैकी अंदाजे 40% भोके ड्रिलिंग करून तयार केलेली असतात. ड्रिलिंग हा यंत्रणाचा जास्त वापरला जाणारा प्रकार असला तरी हे यंत्रण भोकाच्या आतमध्ये केले जात असल्यामुळे टूलच्या कर्तन कडेपाशी (कटिंग एज) काय चालले आहे ते काम ऑपरेटरला दिसत नाही...

ड्रिलिंग : तपशील आणि सुधारणा

ड्रिलिंग प्रक्रियेमध्ये कार्यवस्तूमधील छिद्रे यंत्रण करून तयार केली जातात. परंतु जेव्हा छिद्रांची खोली जास्त असेल तेव्हा चिप नियंत्रण आणि त्यांना दूर नेण्याच्या दृष्टीने त्यात काही वेगळ्या गोष्टींची गरज पडते. ड्रिलिंगचे शॉर्ट होल ड्रिलिंग आणि डीप होल ड्रिलिंग असे कार्याच्या आधारे वर्गीकरण केले जाते...

लिनीअर मोशन गाइड

सर्व यंत्ररचनांमध्ये (मेकॅनिझम) हालचाल असते. त्यामुळे जिथे हालचाल असते, तिथे पूर्वनिर्धारित (प्रीडिटर्माइंड) मार्गाचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक असते. यापूर्वी डोव्हटेल गाइड, बॉक्स गाइड, हायड्रोस्टॅटिक आणि एअरोस्टॅटिक गाइड, घर्षण कमी करण्यासाठी प्लॅस्टिक मटेरियल लावलेले गाइड असे अनेक प्रकारचे गाइड वापरले जात असत...

ड्रिलिंग प्रोग्रॅम

ड्रिलिंग कामामध्ये टूलच्या फिरणाऱ्या कडांचा वापर हव्या असणाऱ्या व्यासाचे आणि खोलीचे दंडगोलाकार भोक करण्यासाठी केला जातो. ड्रिलिंग प्रक्रिया अतिशय सोपी आणि सरळ असते...

उच्च वेगाने 3D मिलिंग करण्यासाठी CAM

धातुकामच्या जानेवारी 2020 अंकात आपण 2D आणि वैशिष्ट्यांवर आधारित मिलिंग तंत्राची माहिती करून घेतली. मला खात्री आहे की तुम्हाला ती माहिती नक्की आवडली असेलच. या अंकात आपण 3D आणि उच्च वेगाने केल्या जाणाऱ्या मिलिंगच्या अत्यंत आकर्षक आणि कौशल्यपूर्ण कामाची माहिती करून घेऊ...

तुटलेले टॅप काढण्यासाठी मेटल आर्क डिसइंटिग्रेटर

आज प्रत्येक मशिन शॉपमध्ये 'मेटल आर्क डिसइंटिग्रेटर' किंवा 'स्पार्क इरोजन मशिन' असावे अशी गरज तयार झाली आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. ..

मायक्रो ड्रिलिंग एस.पी.एम.

1998 साली बंगळुरु येथे सुरू झालेली 'सुहनर' ही कंपनी यंत्रण करणारे कारखाने, पॉवर टूल आणि ट्रान्स्मिशन यंत्रभाग या क्षेत्रातील समस्यांवर उपाय पुरविण्याचे (सोल्युशन प्रोव्हायडर) काम करते...

कर्तन कडेची भूमिती

यंत्रण प्रक्रियेमध्ये टूलच्या कर्तन कडेच्या (कटिंग एज) भूमितीचे (जॉमेट्री) महत्त्व अनन्यसाधारण आहे. या लेखामध्ये आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत. ..

ड्रिलिंगचा खर्च कमी करणारी सुधारणा

आपण 'मिलिंग विशेष' या अंकात (फेब्रुवारी 2020) गिअर ट्रेन हाउसिंग या कास्टिंगमधील यंत्रभागावर केलेल्या मिलिंग प्रक्रियेबद्दल माहिती घेतली. 'ड्रिलिंग' विषयीच्या या अंकात आपण याच यंत्रभागावर ड्रिलिंगचे काम करताना आलेल्या समस्या आणि त्यावर शोधलेल्या उपायांविषयी माहिती घेणार आहोत. ..

ड्रिलचे डिझायनिंग

या लेखामध्ये आपण ड्रिलिंग प्रक्रियेविषयी आणि त्याच्या टूलिंगविषयी माहिती घेणार आहोत. ड्रिलिंग करताना काय काय चुका होऊ शकतात, ज्यांचा बोरिंगवर परिणाम होतो किंवा नेहमीच्या ड्रिलिंगमध्येदेखील कोणकोणते अडथळे येऊ शकतात याची माहिती आपण या लेखात घेऊ. ..

अक्षाच्या मशिन झीरो स्थानासाठी प्रोग्रॅम

प्रत्येक सी.एन.सी. मशिनमध्ये अक्ष, मशिन झीरो स्थानावर जाणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे अक्ष मशिन झीरो स्थानावर नेण्यासाठी मॅन्युअली नियंत्रकावरील (कंट्रोलर) बटण दाबून नेता येतो. नव्याने प्रगत झालेल्या नियंत्रकामध्ये अक्ष रेफरन्स स्थानावर नेण्यासाठी काही ठराविक G कमांड निर्धारित केल्या आहेत. या लेखामध्ये सदर कमांडचा अर्थ, क्रिया आणि उदाहरण देऊन त्याविषयी माहिती दिली आहे. ..

दर्जा आणि उत्पादकतेत वाढ

पश्चिम महाराष्ट्रातील (कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा) आणि बेळगाव येथील औद्योगिक क्षेत्र पाहिले तर याठिकाणी वाहन उद्योगासाठी यंत्रभागांचा पुरवठा करणारे पुरवठादार संख्येने अधिक आहेत...

टेस्टिंगमधील स्वयंचलन

सर्व अभियांत्रिकी उद्योगांमध्ये, अंतिम उत्पादनाची गुणवत्ता सुयोग्य राखण्याच्या दृष्टीने, निरनिराळ्या टप्प्यांवर आपण वापरत असलेल्या मटेरियलची भौतिक गुणवत्ता तपासणे अनिवार्य ठरते. बहुसंख्य प्रकारचे धातू आणि मिश्रधातू वाहन उद्योगापासून हेवी इंजिनिअरिंगमधील विविध उत्पादनांमध्ये वापरले जातात...

फेस मिलिंग

आज दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्तरावरील कारखानदार एकाच प्रकारच्या यंत्रभागाच्या यंत्रणावर अलंबून नसतात. त्यांच्या कारखान्यात सदैव काही ना काही काम सुरू राहणे आवश्यक असते, म्हणजेच त्यांची मशिन अखंड कार्यरत असावी लागतात. उपलब्ध मशिनवर विविध प्रकारचे यंत्रभाग बनविता येत असल्याने आणि त्यांना विभिन्न प्रकारच्या उद्योगक्षेत्रांबरोबर काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे ते शक्य होते...

अँग्युलर व्हील हेड ग्राइंडर

बंगळुरू येथील रेणुका ग्राइंडिंग सोल्युशन्स ही भारतातील प्रमुख ग्राइंडिंग मशिन उत्पादक कंपनी आहे. कंपनीने गेल्या तीस वर्षांपासून शिअरिंग मशिन, सिलिंड्रिकल आणि सेंटरलेस ग्राइंडिंगमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या आम्ही शंभरहून अधिक ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार सेवा देत आहोत...

विमान उद्योगासाठी उपयुक्त टूल

विमान उद्योगांत हलक्या वजनाच्या, ताकद आणि वजनाचे उच्च गुणोत्तर असलेल्या पर्यायी वस्तुंचा वापर आणि एकात्मिक (इंटिग्रेटेड) बांधणी करण्याकडे कल वाढत चालला आहे. विमान उद्योगाकडून अनेक यंत्रभाग सक्षम पुरवठादारांकडे उत्पादनासाठी सोपविले जात आहेत...

उत्पादित वस्तुंसाठी IoT

लेखांत आपण प्रत्यक्ष उदाहरणांच्या मदतीने इंडस्ट्री 4.0 आणि औद्योगिक IoT बद्दल अधिक चर्चा करणार आहोत. ही उदाहरणे शक्यतो भारतीय उद्योगांतील असावीत आणि त्यातून येथील बहुसंख्य अशा लघु आणि मध्यम उद्योगांना प्रेरणा मिळावी, असाच प्रयत्न असणार आहे...

ड्रिलिंग जिग : 8

धातुकाम जुलै 2019 च्या अंकात आपण फ्लॅट टॉप ड्रिल जिगचा वापर कधी, केव्हा आणि कसा करायचा याविषयी सविस्तर जाणून घेतले आहे. अशा प्रकारची जिग प्लेट कधी वापरायची यासाठी काही महत्त्वाचे निकष आपण बघितले आहेत, त्याचा संक्षिप्त आढावा पुढे घेतला आहे...

स्थानिक किंमतीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा

भारतातील पहिली गन ड्रिलिंग मशिन तयार करणाऱ्या प्रेसिहोल मशिन टूल कंपनीची सुरुवात 1987 मध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार एस.पी.एम. तयार करण्यापासून झाली...

सिलिंडर लायनरचे बोरिंग

यंत्रभागांमध्ये आधीच असलेले भोक (होल) मोठे करून आवश्यक व्यास मिळविण्यासाठी त्यावर बोरिंग केले जाते. सर्व प्रकारचे धातू, कास्ट अथवा फोर्ज्ड् केलेल्या यंत्रभागावर ही प्रक्रिया केली जाऊ शकते. यंत्रभागाचा आकार (साइज) आणि घाट (शेप) यांच्यानुसार व्ही.एम.सी., एच.एम.सी. किंवा लेथ मशिनवरदेखील आवश्यक आकाराचे बोअर तयार करणे शक्य असते...

यांत्रिकी क्षेत्र आणि ‘ती’...

मुलगी ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ बनू शकते का? ... का नाही? निश्चित बनू शकते. या लेखाची सुरुवात या विशिष्ट प्रश्नाने मुद्दामच केली आहे. 8 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो...

उत्पादनातील स्वयंचलनासाठी ऑप्टिकल मेट्रॉलॉजी

उत्पादनाच्या गुणवत्तेचे जिथे काटेकोर मानक पाळावे लागतात अशा कोणत्याही औद्योगिक प्रक्रियेमध्ये संवेदक (सेन्सर) आणि स्मार्ट प्रणाली यांचे स्थान अजूनही समर्पक आणि महत्त्वपूर्ण आहे...

बोरिंग प्रक्रियेतील आव्हाने

औरंगाबाद येथील सिग्मा टूलिंग्ज कंपनी जवळपास दोन दशके विविध प्रकारच्या टूलची निर्मिती करीत आहे. वाहन उद्योग, कृषी उपकरणे, अवजड अभियांत्रिकी, ऑइल आणि गॅस तसेच अर्थ मूव्हिंग उपकरणे अशा विविध अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये कंपनीचे 600 हून अधिक ग्राहक आहेत...

बोरिंग प्रोग्रॅम

बोरिंगमध्ये भोकाच्या आतील व्यासावरील मटेरियल काढले जाते. यामध्ये भोकाची खोली वाढविण्याच्या दृष्टीने कोणतेही काम केले जात नाही...

व्ही.एम.सी. वरील बोरिंगच्या उत्पादकतेत वाढ

या लेखामध्ये आपण पी.टी.ओ. हाउसिंगमधील अधिक संवेदनशील असलेल्या बोरिंग कामाविषयी माहिती घेणार आहोत. पी.टी.ओ. हाउसिंगमध्ये 100 मिमी. आणि 90 मिमी. व्यासाची दोन वेगवेगळी भोके असून 100 मिमी.च्या बोरिंगच्या व्यासामध्ये 100 मिमी., 70 मिमी. आणि 50 मिमी. अशा 3 पायऱ्या (स्टेप) आहेत...

कॉम्बिनेशन बोरिंग टूल

औरंगाबाद येथील आमची गौरव इंजिनिअर्स कंपनी मागील 26 वर्षांपासून टूलिंग क्षेत्रात सातत्याने ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार अखंड सेवा देत आहे. यंत्रभागावरील भोक बोरिंग प्रक्रियेने फिनिश केले जाते. ही प्रक्रिया सुलभ आणि किफायती होण्यासाठी उपलब्ध असलेले टूलिंगमधील विविध पर्याय आणि बोरिंग प्रक्रियेविषयी मूलभूत माहिती आपण या लेखात घेणार आहोत. ..

बोरिंग फिक्श्चर

कार्यवस्तूवर आधी भोक असल्याशिवाय बोरिंग करता येत नाही. त्यामुळे बोरिंग ऑपरेशन हे दुसऱ्या टप्प्यातील यंत्रण आहे. हे यंत्रण सेंटर लेथ, ड्रिलिंग, मिलिंग, सी.एन.सी. (एच.एम.सी./व्ही.एम.सी.) मशिनवर करता येते...

अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग : आज आणि उद्या

अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगबाबतचे (3D प्रिंटिंग) सुरुवातीचे उत्साहाचे उधाण आता थोडे कमी झाले असून, मागील 5 वर्षांत याविषयी प्रसार माध्यमातून होणारा उदो उदोही कमी झाला आहे. प्रत्यक्ष डिझाइन, कामाचे आयोजन आदींबाबत अधिक काम केले जात आहे...

कट टॅपिंग / फॉर्म टॅपिंग : एक तुलना

टॅपिंग ही एक साधी प्रक्रिया आहे. छोट्या व्यासाच्या छिद्रांना अंतर्गत आटे (थ्रेड) करण्यासाठी ही प्रक्रिया वापरली जाते. ज्या आकाराचे आटे कार्यवस्तूमध्ये अपेक्षित आहेत, त्याची ‘मिरर इमेज’ असलेले आटे टॅपिंग टूलवर केलेले असतात...

मॅन्‍युअल आणि कॅम प्रोग्रॅमिंग

कॅम म्हणजे संगणकाच्या साहाय्याने उत्पादन (कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग) हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तसेच सध्याच्या संदर्भात जिथे धातू यंत्रणाचा संबंध असेल, तिथे याचा उपयोग समानार्थीपणे अर्थात, संगणकाच्या साहाय्याने यंत्रण (कॉम्प्युटर एडेड मशिनिंग) याच्यासाठी करू शकतो...

फानुकचा स्‍मार्ट सर्व्हो कंट्रोल

भारतामध्ये उत्पादन क्षेत्र हे उच्च विकासाच्या क्षेत्रांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. देशाला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून जागतिक नकाशावर नेण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला जागतिक मान्यता देण्यासाठी भारत सरकारने ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम सुरू केला आहे...

शोल्‍डर मिलिंग

वस्त्रोद्योगात विविध प्रकारच्या मशिन वापरल्या जातात. या मशिनच्या निर्मितीमध्ये अलॉय स्टील, स्टेनलेस स्टील, अ‍ॅल्युमिनिअम, फोर्ज्ड स्टील अशा वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल वापरले जाते. या मशिनमधील बहुतेक सर्व भाग (पार्ट) सतत कार्यरत असतात. त्यामुळे वापरले जाणारे मटेरियल झीज प्रतिरोधक, तसेच अधिक आयुर्मान असणारे गरजेचे असते...

स्‍केलिंग फंक्‍शन

सर्वसामान्यपणे सी.एन.सी. मशिनिंग सेंटरवर प्रोग्रॅमप्रमाणे होणारी टूलची हालचाल ड्रॉइंगमधील मापांप्रमाणे असते. काही वेळेला कटरच्या त्रिज्येचा ऑफसेट त्यात मिळविलेला असतो. बर्‍याचवेळा मशिनिंग सेंटरवर काम करत असताना प्रोग्रॅमप्रमाणे चालणार्‍या टूलची हालचाल परत परत त्याच मार्गाने करण्याची गरज निर्माण होते...

भविष्यातील तंत्रज्ञान मांडणारे ’ इमो 2019’

धातुकामाच्या जगातील आघाडीच्या व्यापार मेळ्याचे स्थान भूषविण्याचा मान हॅनोव्हर, जर्मनी येथे भरणार्‍या ‘इमो’चा आहे. युरोपिअन असोसिएशन ऑफ द मशिन टूल इंडस्ट्रीजच्या वतीने जर्मन मशिन टूल बिल्डर असोसिएशनकडून (VDW) इमो प्रदर्शनाचे आयोजन हॅनोव्हर येथे करण्यात येते. ..

योग्य मशिनची निवड करताना

मशिनची निवड आणि त्यासंबंधी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर पुढील घटक कसे परिणाम करतात, हे आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर 2019 महिन्यात प्रकाशित झालेल्या लेखात बघितले...

रोटरी टेबल हाउसिंगच्या उत्पादकतेत वाढ

इंद्रदेवबाबूंनी 1986 मध्ये सुरू केलेल्या युकॅम या स्वदेशी कंपनीने एका लहानशा कार्यशाळेपासून, रोटरी टेबलचे भारतातील सर्वात मोठे निर्माते होण्यापर्यंत विलक्षण प्रगती केली आहे. सतत विकास करण्याच्या प्रवासात, युकॅमने नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याची मानसिकता ठेवली आहे. सर्वोत्तम कार्यपद्धती शोधत राहणे आणि त्यांचा अवलंब करणे, हेच कंपनीचे ब्रीद आहे...

ड्रिलिंग फिक्‍श्र्चर / जिग

या लेखामध्ये आपण लीफ/लॅच टाइप जिग कसे कार्य करते याबद्दल माहिती घेऊ. अशा प्रकारच्या जिगची गरज का आणि कधी निर्माण होते ते बघणे निश्चितच उत्कंठावर्धक ठरेल...

स्टील, स्टेनलेस स्टील आणि कास्ट आयर्नचे मिलिंग

मिलिंग प्रक्रियेमध्ये मिलिंग करताना कार्यवस्तू स्थिर असते आणि टूल फिरत असते. टूल फिरत असताना एक किंवा अधिक धारदार कडा (एज) कार्यवस्तुच्या संपर्कात येतात आणि अतिरिक्त मटेरियल काढून टाकतात...

मिलिंग मशिनची आवश्यक वैशिष्ट्ये

मशिन टूलचे मुख्य उद्दिष्ट कार्यवस्तूमधील अतिरिक्त मटेरियल कापून बाहेर काढणे होय. मिलिंग प्रक्रियेमध्ये कटर फिरतात आणि टूल कार्यवस्तुतील मटेरियल अक्षाच्या कोनाच्या दिशेत कापून बाहेर काढते. मिलिंग मशिनच्या मदतीने लहान आणि मोठ्या आकाराची अनेक यंत्रण कामे करता येतात...

अ‍ॅडॅप्टिव्ह कंट्रोल सिस्टिम

या लेखात आपण फानुक सी.एन.सी. वापरून आवर्तन काळाचे (सायकल टाइम) इष्टतमीकरण (ऑप्टिमायझेशन) करण्यासाठी मशिनिंग सेंटरमध्ये उपलब्ध असलेली काही प्रगत वैशिष्ट्ये समजून घेऊ...

मिलिंग मशिनच्या स्पिंडलची देखभाल

कोणतीही वस्तू तिच्या संपूर्ण कार्यकाळात आपण चांगल्या स्थितीत ठेवू किंवा राखू शकलो तर नेहमीच फायद्याचे असते. जर आपण आपले वाहन नेहमी चांगल्या स्थितीत ठेवले तर त्याच्या देखभालीसाठी (मेंटेनन्स) जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. हे केवळ चांगल्या देखभालीमुळेच शक्य आहे. चांगल्या देखभालीचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत...

‘टंगालॉय’चा नवीन 88° मिलिंग कटर

‘टंगालॉय’ कंपनी यंत्रणासाठी उपयुक्त अशी वैविध्यपूर्ण टूल बनविण्यामध्ये अग्रेसर आहे. ग्राहकाभिमुख धोरणामुळे आमच्याकडे निरनिराळ्या प्रक्रियांमधील अडचणी शोधून त्यावर विशेष टूल बनविण्याचे काम चालू असते...

समतल पृष्ठभाग मिलिंग फिक्श्चर

धातुकामचा फेब्रुवारी 2020 अंक खास मिलिंग प्रक्रियेशी संबंधित असल्याने समतल पृष्ठभागाचे मिलिंग कसे करावे याची माहिती या लेखात देणे सयुक्तिक ठरते. समतल पृष्ठभागाच्या मिलिंगसाठी कार्यवस्तू पकडणे हेच मुळात आव्हानात्मक असते. जर थोड्या प्रमाणात कार्यवस्तू बनवायच्या असतील तर ते काम कार्यवस्तू वाइसमध्ये पकडून करता येईल...

गिअर ट्रेन हाउसिंगचे मिलिंग

वेद इंडस्ट्रीज या आमच्या कारखान्यामध्ये विविध प्रकारच्या यंत्रभागांवर आम्ही काम करीत असतो. सर्व यंत्रभागांचे कास्टिंग आमच्याच फाउंड्रीमध्ये तयार होते. त्यासाठी सर्व सोयींनी युक्त अद्ययावत सेटअप आमच्याकडे आहे. काही वेळेला अशीही परिस्थिती येत होती की काम वाढल्यामुळे काही यंत्रभागांचे काही अंशी यंत्रण आम्ही बाहेरून करवून घेत होतो...

शॉप फ्लोअर मेट्रॉलॉजीः संनियंत्रण आणि उपाययोजना

मिलिंग मशिन आणि मशिनिंग सेंटर वापरून केलेल्या यंत्रणातील चुकांमुळे नाकारल्या जाणार्‍या (स्क्रॅप) यंत्रभागांची निर्मिती ही उत्पादन क्षेत्रामधील मुख्य समस्या आहे. ही समस्या टाळण्याचा एक मार्ग म्हणजे कार्यवस्तू मशिनच्या टेबलवर कशी ठेवली आहे, हे जाणून घेणे..

मिलिंगच्या जलद प्रोग्रॅमिंगसाठी 2D CAM

    प्रोग्रॅमिंग पद्धतींचा वापर करून सी.एन.सी. टर्निंग आणि फेसिंग, बोअरिंग, ड्रिलिंग आणि पार्टिंग या प्रक्रियांबाबत आपण डिसेंबर 2019 मधील अंकात जाणून घेतले. या लेखात प्रोग्रॅमिंग पद्धतींच्या तपशिलात न जाता 2D आणि वैशिष्ट्यांवर (फीचर) आधारित मिलिंगच्या महत्त्वपूर्ण बाबींबाबत चर्चा करणार आहोत.   2D मिलिंगची ओळख   2D मिलिंग हा यंत्रण प्रक्रियेचा सर्वात मूलभूत प्रकार आहे. मागील प्रकरणात आपण अभ्यास केलेल्या काही क्लिष्ट लेथ ऑपरेशनपेक्षा हे सोपे वाटू शकते. एका पानावर ..

गेज ब्लॉक कंपॅरेटर प्रणालीचे स्वयंचलन

    बहुतांश महत्त्वाच्या उद्योगातील वर्कशॉपमध्ये उत्पादनाचे मोजमापन करणारी निरनिराळी गेज त्यांच्या मध्यवर्ती गेज लॅबोरेटरीमध्ये ठराविक कालमर्यादेमध्ये कॅलिब्रेट केली जातात. विविध मोजमापांच्या गेज तपासणीसाठी विविध आकाराची स्लिप गेज वापरली जातात. या स्लिप गेजलाच ‘गेज ब्लॉक’ असेही नाव आहे. हार्डन टूल स्टील, टंग्स्टन कार्बाइड आणि सिरॅमिक वापरून गेज ब्लॉक बनविलेले असतात.    0.5 मिमी. ते 100 मिमी.पर्यंतच्या निरनिराळ्या आकाराच्या गेज ब्लॉकचे काही ठराविक सेट वापरले ..

लीन मॅन्युफॅक्चरिंगचा प्रभावी वापर

सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक कारखानदाराने नवनवीन सुधारणा करण्याचे प्रयत्न करणे तसेच आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून उत्पादनक्षमता कशी वाढविता येईल याबद्दल नेहमीच विचार करणे गरजेचे आहे. याच विचाराने आम्ही आमच्या सातारा येथील खुटाळे इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीमध्ये ‘लीन मॅनेजमेंट’चे तत्त्व वापरून, शॉप फ्लोअरवर आवश्यक ते बदल करून वाया जाणारा वेळ आणि खर्चात कशा प्रकारे कपात केली याविषयीची माहिती या लेखात दिली आहे.   लीन व्यवस्थ..

खाचांचे मिलिंग

सर्वसामान्यपणे मिलिंगसाठी मिलिंग मशिन वापरले जाते. काही विविक्षित ठिकाणी टर्निंग मशिनवर मिलिंग ऑपरेशन करून अवघड वाटणारी कार्यवस्तू सहजासहजी करता येते. त्यासाठी C अक्ष आणि लाइव्ह टूलिंग यांचा वापर करून घेतला आहे...

‘मझाक’चे बहुअक्षीय मिलिंग मशिन

निओसिम कंपनी सी. के. बिर्ला ग्रुपमधील वाहन उद्योगासाठी लागणार्‍या अवजड यंत्रभागांच्या निर्मितीमधील अग्रगण्य कंपनी आहे. पुण्याशेजारील तळेगाव ढमढेरे येथे त्यांची एक फाउंड्री आणि वेगळे मशिन शॉप आहे. ट्रक, बस, ट्रॅक्टर तसेच लहान अर्थमूव्हिंग इक्विपमेंटसाठी लागणारे गिअर बॉक्स, डिफरन्शिअल हाउसिंग अशा अवजड यंत्रभागांचे कास्टिंग त्यांच्या फाउंड्रीमध्ये केले जाते...

स्क्वेअर शोल्डर मिलिंग

मशिनचा वापर, मनुष्यबळाचा प्रभावी वापर आणि कारखान्याचा स्थिर खर्च या सर्व गोष्टी कोणत्याही उत्पादकाचा नफा आणि स्पर्धात्मकता निर्धारित करतात. यासाठी कटिंग टूलकडून कमीतकमी वेळात दर्जेदार यंत्रभागांची निर्मिती होताना मशिनचा वेळ वाचून, प्रति दिवस अधिकाधिक यंत्रभागांचे उत्पादन होण्याची अपेक्षा असते...

बहुउद्देशीय ‘प्लँट मॅनेजर’ प्रणाली

उद्योग जगतामध्ये इंडस्ट्री 4.0 या संकल्पनेचे अनेक पैलू वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला पहायला मिळतात. संगणकीय ERP सिस्टिम हा त्याचाच भाग जरी नसला तरी गेल्या 10-15 वर्षांत मोठ्या कंपन्यांबरोबरच लघु..

मिलिंगसह ड्रिलिंग आणि टॅपिंगसाठी DTC 400XL

DTC म्हणजे ड्रिल टॅप सेंटर होय. हे मशिन प्रामुख्याने मिलिंगबरोबरच ड्रिलिंग आणि टॅपिंग कामासाठी वापरले जाते. काही यंत्रभागांसाठी जलद गतीने ड्रिलिंग आणि टॅपिंग करतानाच कमीतकमी चिप ते चिप वेळ मिळवून आवर्तन काळ (सायकल टाइम) कमी करणे गरजेचे असते...

शीतक फिल्टरेशन सिस्टिम

उद्योग यशस्वीरित्या चालण्यासाठी अनेक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. त्यापैकीच एक महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पादन खर्च. यामध्ये कच्चा माल, वेळ, मनुष्यबळ या घटकांवर होणारा खर्च समाविष्ट असतो...

टर्निंगसाठी कॅड-कॅम

या लेखात सी.एन.सी. टर्निंगसाठी कॅम, मूलभूत प्रोग्रॅमिंग कार्यपद्धती, टर्निंगसाठी कॅम वापरण्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण बाबी आणि शेवटी टर्निंगमध्ये उच्च उत्पादनक्षमता मिळविण्यासाठी काही प्रगत कॅम तंत्रांबद्दल चर्चा केली आहे...

मशिनवर केलेले टर्निंगचे संनियंत्रण

धातू कर्तन प्रक्रियेच्या दृष्टीने, यंत्रभागांचे रोटरी यंत्रभाग आणि प्रिझमॅटिक यंत्रभाग असे दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. या लेखात आपण रोटरी यंत्रभाग आणि त्यासाठी आवश्यक असणार्‍या टर्निंग प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत...

प्रोग्रॅमिंग : आव्हानात्मक टर्निंग

टर्निंगमध्ये दोन अक्ष आणि स्पिंडल असे कॉम्बिनेशन असते. आडवा (हॉरिझॉन्टल) Z अक्ष आणि त्याला काटकोनात X अक्ष असतो. साध्या एकरेषीय टर्निंगबरोबरच कंस (आर्क) किंवा त्रिज्या असणार्‍या कार्यवस्तुसुद्धा यंत्रण करता येतात...

नवीन उत्पादने : मोठ्या आणि लांब कार्यवस्तुंसाठी CLX 750

इमो हॅनोव्हर 2019 प्रदर्शनामध्ये डीएमजी मोरीने CLX मालिकेतील नवीन मॉडेल CLX 750 सादर केले. हे मशिन 600 किलो वजनापर्यंतच्या आणि 1,290 मिमी.पर्यंत टर्निंग लांबीच्या कार्यवस्तुंसाठी डिझाइन केलेले, तसेच युनिव्हर्सल टर्निंग सेंटर म्हणून विशेषत: मोठ्या शाफ्टच्या यंत्रणासाठी उपयुक्त आहे...

मशिन मेंटेनन्स : स्पिंडल टेपर इन सिटू ग्राइंडिंग

बर्‍याचदा मला माझा व्यवसाय म्हणजे एक परीकथा वाटते. आजवरच्या व्यावसायिक आयुष्यात अनेक कथा तयार झाल्या. मग त्यामध्ये व्यवसाय कसा चालू झाला याची कथा असेल, वेस्टविंडचे ऑथोरायझेशन असेल, मशिन शॉप कसे सुरू झाले याची एक वेगळीच कथा आहे, ..

टूलिंग : स्टेनलेस स्टीलचे इष्टतम टर्निंग

अभियांत्रिकी अ‍ॅप्लिकेशनसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर नेहमीच एक अभियांत्रिकी विरोधाभासाचा विषय राहिला आहे. डिझाइन अभियंते या सहज उपलब्ध असणार्‍या मटेरियलद्वारे मिळणार्‍या मजबूतपणा आणि गंज प्रतिरोधकता या गुणधर्मांमुळे स्टेनलेस स्टील (SS) वापरायला उत्सुक असतात...

टूलिंग: कास्ट आयर्न टर्निंगसाठी ISO इन्सर्ट

टूलिंग: कास्ट आयर्न टर्निंगसाठी ISO इन्सर्ट..

टूलिंग: इन्सर्टवरील प्रीमियम टेक लेपन

बहुसंख्य उद्योगांमध्ये स्टीलचे यंत्रभाग वापरलेले असतात. सर्वसाधारणपणे जास्त कठीणता असणार्‍या स्टीलच्या यंत्रणामध्ये, सामान्य यंत्रणाच्या तुलनेत सुमारे 70% वेळ आणि खर्च वाढतो. यामुळे ISO P ग्रेडचे स्टील टर्निंग करताना समस्या येत असतात. ..

HPT साठी उपयुक्त हायड्रोस्टॅटिक गाइडवेज

हार्ड पार्ट टर्निंग (HPT) ही 50 HRC ते 70 HRC दरम्यान कठीणीकरण केलेल्या कार्यवस्तूंचे एकाच तीक्ष्ण टोकाने यंत्रण करण्याची प्रक्रिया आहे. ..

नवीन उत्पादने: मोठे सी.एन.सी. टर्निंग सेंटर

उत्पाद निर्मितीच्या तंत्रज्ञानातील प्रगती आणि औद्योगिक क्रांतीमुळे सर्वच बाबतीत अचूकतेची मागणी करणे आता शक्य झाले आहे. ही मागणी केवळ लहान किंवा मध्यम आकाराच्या यंत्रभागांपुरतीच मर्यादित नाही, तर मोठ्या आकाराच्या यंत्रभागांसाठीही केली जाते...